घरमहाराष्ट्रआता फॉर्म्युला फिप्टी फिप्टीच!

आता फॉर्म्युला फिप्टी फिप्टीच!

Subscribe

लोकसभा निवडणुकीवेळी युतीसाठी करण्यात आलेल्या ५० टक्के सत्तेच्या वाट्याच्या फॉर्म्युल्यानुसारच राज्यात युतीचे सरकार स्थापन केले जाईल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबरोबरच सरकारमधील अर्धी मंत्रिपदे आणि महामंडळांच्या वितरणाचे तत्व भाजपला अंगिकारावे लागेल. यामुळे भाजपपुढे नवे संकट उभे राहिले आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना उध्दव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.राज्यातील मतदारांनी अतिशय पारदर्शकपणे जनाधार दिला आहे. जनतेच्या या निकालामुळेच आता जबाबदारीने काम करावे लागेलच. पण इतर कुठल्या प्रश्नाऐवजी रोजच्या आयुष्यातील आणि जीवनमरणाच्या प्रश्नावर काम करा, असा संदेशच लोकांनी दिला आहे. राज्यातील प्रश्नांऐवजी वैयक्तिक टीकेचाही लोक विचार करतात, असा टोलाही त्यांनी भाजपला लावला.

आता फॉर्म्युला फिप्टी फिप्टीच!
राज्यात युतीने निवडणुका लढवण्यासाठी लोकसभा निवडणुकीवेळी तयार करण्यात आलेल्या फॉर्म्युल्यानुसार सरकार स्थापन करण्यात येईल, असे सांगताना आजवर प्रदेशाध्यक्षांकडून अनेक अडचणी पुढे केल्या जायच्या. आता आम्हालाही आमचा पक्ष वाढवायचा आहे. सगळ्या अडचणी आम्हीच नाही समजून घेऊ शकत नाही, असे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीवेळी संयुक्तरित्या स्वीकारण्यात आलेल्या ५० टक्के सत्तेचा फॉर्म्युल्यानुसारच सरकार स्थापले जाईल, अशी स्पष्ट भूमिका उध्दव ठाकरे यांनी मांडली. जनतेने दिलेला कौल हा पारदर्शक कारभाराचा आहे. जनतेच्या या कौलाचे आम्ही स्वागत करतो.

- Advertisement -

हा कौल म्हणजे पारदर्शक कारभाराची जनतेची अपेक्षा होय, जनतेच्या या कलाचा मला अभिमान आहे, हा ट्रेण्ड हाच जनतेचा आशीर्वाद आहे, असे उध्दव म्हणाले. हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. तो कोणाचेच दडपण स्वीकारत नाही. जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी सरकारला काम करावे लागेल, असेही उध्दव म्हणाले.

राज्यात मुख्यमंत्री कोणाचा, या प्रश्नावर केवळ मुख्यमंत्रीपद महत्वाचे नाही. लोकसभेच्या निवडणुकीवेळी युतीसाठी बनवण्यात आलेल्या फॉर्म्युल्यानुसारच सरकार स्थापले जाईल, असे उध्दव ठाकरेंनी स्पष्ट केले. हा फॉर्म्युला काय होता, हे जाणून घ्याचे असेल तर बीकेसीत पार पडलेल्या अमित शहांबरोबरील संयुक्त पत्रकार परिषदेची क्लिप पहावी, असा सल्लाही उध्दव यांनी भाजपचे नाव न घेता दिला. याच फॉर्म्युल्यानुसार या निवडणुकीत प्रत्येकी १४४ जागा लढवण्याचे ठरवण्यात आले होते. ते झाले नाही. आता आम्हीच समजून घेऊ शकत नाही, असे सेना पक्षप्रमुखांनी भाजप नेत्यांना बजावले. जे काही ठरवायचे ते एकत्र बसून ठरवू. यासाठी आवश्यकता पडली तर अमित शहा यांना मुंबईत बोलवून घेऊ.

- Advertisement -

पण सरकारची निर्मिती पारदर्शक पध्दतीनेच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय नेत्यांचे डोळे बंद होतात तेव्हा लोक आपले डोळे उघडतात. आता सरकारच्या निमित्ताने लोकांची तीव्रता वाढायला नको, यामुळेच फॉर्म्युलानुसारच पुढे जावे लागेल, पण सत्तेसाठी वेडेवाकडे पाऊल टाकणार नाही. पण फॉर्म्युल्यानुसारच सरकारचा दावा करू, असे उध्दव ठाकरे यांनी बजावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -