घरमहाराष्ट्रभाजपविरोधात ओबीसी नेते एकवटले

भाजपविरोधात ओबीसी नेते एकवटले

Subscribe

भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आपण एकत्र यायला हवे, अशी भूमिका मांडल्याचे प्रकाश शेंडगे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांना सांगितले. प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांनी एकनाथ खडसे यांची गुरुवारी भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ‘भाजपमध्ये वर्षानुवर्ष ओबीसी नेत्यांवर अन्याय होत आहे. आता हे थांबवण्यासाठी आम्ही एकनाथ खडसे यांची भेट घेतली.

तसेच यासाठी इतर भाजपच्या नेत्यांची पण भेट घेणार असल्याचे सांगितले. प्रकाश अण्णा शेंडगे, जे. डी. तांडेल, दशरथ पाटील यांच्यासह काही नेत्यांनी ही भेट घेतली. विशेष बाब म्हणजे आज शेंडगे यांच्यासोबत खडसे यांच्या भेटीला गेले होते. त्यापैकी एकही जण भाजपचा सदस्य नव्हता. दरम्यान, भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलले जात असल्याची नाराजी खडसे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

15 दिवसात ओबीसी नेत्यांची बैठक
भाजपमध्ये ओबीसी नेत्यांची गळचेपी होत असेल तर ती खपून घेतली जाणार नाही. महाराष्ट्रातील ओबीसींची सर्व ताकद खडसे यांच्या मागे उभी करू, असा इशारा या नेत्यांनी दिला. तसेच येत्या 15 दिवसात लवकरच सर्व ओबीसी नेते मिळून या संदर्भात बैठक घेणार आहेत, अशी माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली.

माधव भांडारी यांची शेंडगेवर टीका
प्रकाश शेंडगे यांना भाजपबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. जिथे सत्ता असते तिथे जाऊन चिकटणारे व्यक्तीमत्व प्रकाश शेंडगे यांचे आहे. त्यांना कुठल्याही समाजात स्थान नाही, अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -