घरमहाराष्ट्रमराठ्यांसाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास संघर्ष अटळ

मराठ्यांसाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास संघर्ष अटळ

Subscribe

ओबीसी नेत्यांचा राज्य सरकारला इशारा

मराठा समाजाला आरक्षण द्या, त्याला आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसींमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नका. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर संघर्ष अटक आहे, असा इशारा ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडवलेच पाहिजे. त्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही; पण मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊन ओबीसी आरक्षणाला धक्का देऊ नये, नाही तर संघर्ष अटळ राहील. संघर्ष होऊ नये आणि जातीय सलोखा कायम राहावा ही आमची भूमिका असून सरकारनेही हा सलोखा कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे शेंडगे यांनी केली आहे.

- Advertisement -

मराठा समाजाला एससीबीसीमध्ये घालण्याचे षडयंत्र झाले आहे. आमचा त्याला विरोध असून सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकणार नाही. ही कल्पना पूर्वीच होती आणि आता तेच घडले आहे, असेही ते म्हणाले. काही मराठा नेते ओबीसी आरक्षणाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करत असून त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणीही केली. धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशाराही त्यांनी दिला. धनगर समाजासाठी ६ आणि ओबीसींसाठी ७४ वस्तीगृहे स्थापन करण्याची घोषणा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली असून या घोषणेची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -