घरताज्या घडामोडीऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्यासाठी पैजा, त्यामुळे नियुक्त्या रखडल्या!

ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्यासाठी पैजा, त्यामुळे नियुक्त्या रखडल्या!

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.

ऑक्टोबरपर्यंत राज्यपाल सरकारचं ऐकणार नाही. महाराष्ट्राचे सध्याचे सरकार पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू अशा बाहेर पैजा लागल्या आहेत. असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असेलल्या दैनिक सामन्याच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी राज्यपालांना १२ सदस्य निवडीची आठवण करून दिली. विविध क्षेत्रांतले तज्ज्ञ राज्यपाल नेमतात, पण त्यांच्या शिफारसी मंत्रिमंडळ करते. त्यांची नेमणूक वेळेत झाली नाही तर ती घटनेची पायमल्ली व स्वातंत्र्याची मुस्कटदाबी ठरेल. आणीबाणीत नेमके हेच झाले होते’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हटलय सदरात

विधान परिषदेवर राज्यपालांच्या सहीने १२ जणांची नेमणूक होईल, पण सध्याचे राज्यपाल या नेमणुक करण्यास अनुकूल नाहीत असे वृत्त ठळकपणे प्रसिध्द झाले. ते चिंताजनक आहे. सरकारने १२ सदस्यांच्या शिफारसी केल्या तरी राज्यपाल या शिफारसींवर तत्काळ सही करणार नाहीत. १५ जूनला सर्व १२ सदस्यांची मुदत संपली व या जागा रिक्त झाल्या. त्या तात्काळ भरल्या तर नवे सदस्य कामाला लागतील. पण कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नामनियुक्त आमदारांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यास अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी सरकारला दिले आहेत. हे खरे असेल तर १२ सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. ऑक्टोबरचाच महिना कशासाठी? यावर बाहेर अशा पैजा लागल्या आहेत की, महाराष्ट्राचे सध्याचे सरकार पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू. नंतर येणारे सरकार नामनियुक्त १२ जणांच्या नेमणुका करेल, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही. या राजकारणात राज्यपाल नावाची घटनात्मक संस्था नाहक बदनाम केली जात आहे.

- Advertisement -

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती हा सध्या राज्यातील गरमागरमीचा विषय झाला आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ राज्यपाल नेमतात, पण त्यांच्या शिफारसी मंत्रिमंडळ करते. त्यांची नेमणूक वेळेत झाली नाही तर ती घटनेची पायमल्ली व स्वातंत्र्याची मुस्कटदाबी ठरेल. आणीबाणीत नेमके हेच झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -