घरमहाराष्ट्रसाताऱ्यात बेछूट गोळीबार; एकाची हत्या

साताऱ्यात बेछूट गोळीबार; एकाची हत्या

Subscribe

साताऱ्यातील कराड येथे एका व्यक्तीवर बेछूट गोळीबार करण्यात आली असून या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.

साताऱ्यातील कराड येथे एका व्यक्तीवर बेछूट गोळीबार करण्यात आल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर कराड शहर आणि इतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

कराड येथील बुधवार पेठ परिसरातील कथित गुंड पवन सोलवंडी यांच्यावर बेछूट गोळीबार करुन त्याची हत्या करण्यात आली आहे. चार अज्ञात हल्लेखोरांनी पवन यांच्यावर केलेल्या बेछूट गोळीबारात त्यांच्यावर ११ गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. हल्लेखोर स्थानिकच असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने तपास चक्रे गतिमान करण्यात आली आहेत. याप्रकरणी तीन वेगवेगळी तपास पथके तयार करून संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास मंगळवार पेठेतील बांधकाम व्यवसायिक निहाल अल्ताफ पठाण याला खंडणी मागून ती न दिल्याने त्यांच्या घराच्या परिसरात पवन सोलवंडेसह अन्य चौघांनी नंग्या तलवारीची दहशत माजवली याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


हेही वाचा – राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवरून मनसेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आत्महत्या

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -