नील गायीमुळे एकाचा मृत्यू

नीलगायीने लक्ष विचलीत केल्याने दूचाकी चालकाचा अपघात झाला आहे. या अपघातात दूचाकी चालकाला आपला जीव गमावावा लागला. जळगावमध्ये हा प्रकार घडला.

Jalgaon
Accident

पाणवठ्याच्या शोधासाठी रस्ता ओलांडण्यासाठी नीलगायीने झेप घेताच दूचाकी चालकाचे लक्ष विचलतीत झाले. या घटनेत दूचाकी चालकाचा मृत्यू झाला. या घटनेत ईतर गाडी चालकही गंभीर जखमी झाला आहेत. जळगाव येथे ही घटना घडली. दरम्यान अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न केले. मात्र उपचारापूर्वीच या इसमाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी जळगाव पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. दरम्यान या प्रकारानंतर अपघात क्षेत्रात खळबळ उडाली होती. गणेश सोनार (३५) असे मयत इसमाचे नाव असून तो याच परिसरात राहात होता. गाईमुळे लक्षविचलीत झाल्याने त्याला समोरून येणारी गाडी दिसू शकली नाही असे प्रत्यक्षदर्षींनी सांगितले आहे.

कसा घडला प्रकार 

दरम्यान जळगाव पोलिसांनी घटनेसंदर्भात माहिती मिळवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गणेश सोनार हा दूचाकीने या परिसरातून जात होता. त्यावेळी नीलगायही या रस्त्यावरून जात होती. गायीने अचानकपणे रस्तावर उडी घेतली. “मयत गणेश सोनार (३५), जितेंद्र सपकाळे (३८) व चालक दीपक सोनार (३०) असे या तिघांची नावे आहेत. दूचाकी क्रमांक एम.एच. ४६ झेड २४७० ने ते या ठिकाणाहून जात होते. अचानक गाय समोर आल्यामुळे गणेश घाबरला. त्यामुळे दूकाचेचा तोल गेला. यामध्ये झालेल्या अपघातात गणेशचा मृत्यू झाला”- तपास अधिकारी जळगाव पोलीस