घरमहाराष्ट्रधरणावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह दोन मुलांचा मृत्यू

धरणावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह दोन मुलांचा मृत्यू

Subscribe

पाण्यामध्ये खेळत असताना एक मुलगा बुडू लागला. त्याचा वाचण्यासाठी त्याची सोहेलची आई आणि बहिणीने पाण्यात उडी मारील. मात्र या तिघांचा देखील यामध्ये दुर्देवी मृत्यू झाला.

बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माजलगाव धरणावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेह तीच्या दोन मुलांचा धरणात बुडून मृत्यू झाला. माजलगावच्या रेनापुरी येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळ रेनापुरी गावावर शोककळा पसरली आहे.

रेनापुरीत राहणारी एक महिला माजलगाव धरणावर कपडे धुण्यासाठी गेली होती. तिच्या सोबत तिचा मुलगा आणि भाची होती. मुलगा पाण्यात पोहण्यासाठी उतरला तो बुडताना पाहून महिलेने आणि मुलीने देखील पाण्यात उडी मारली. मुलाला वाचवण्यासाठी नादात तिघे जण बुडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. शेख नसू ही महिला माजलगाव शेजारी असलेल्या भाटवडगाव येथील शेख मोहम्मद यांची मुलगी आहे. ती दोन दिवसापूर्वीच औरंगाबादमधून कुटुंबास भेटण्यासाठी आली असताना ही घटना घडली आहे.

- Advertisement -

माजलगाव धरणा शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्यासाठी एक महिला आणि तीन-चार बालके गेली होती. शेख सोहेल शेख नजीम हा पाण्यात खेळताना बुडू लागला. त्याला पाहून त्याची मावस बहीण शेख तबु शेख गफार हिने पाण्यात उडी घेतली. पण भावाला वाचवण्याऐवजी तीच पाण्यात बुडू लागली. हे पाहून सोहेलची आई शेख नसू शेख नामु ही देखील पाण्यात उतरली. पाणी खोल असल्याने आणि तिघांना पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झालाय. ही घटना घडल्यानंतर घरणालगत असलेल्या लोकांनी आरडाओरडा पाहून घटनास्थळी धाव घेत. तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत तिघांचा देखील मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -