घरताज्या घडामोडीवाहतूक नियम मोडला एकाने अन् दंड भलत्यालाच

वाहतूक नियम मोडला एकाने अन् दंड भलत्यालाच

Subscribe

तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी ते हाताळताना अगदी लहान चूकही निर्दोष व्यक्तीला कशी महागात पडते, याची प्रचिती नाशिक महानगरातील एका महिलेला आली. या घटनेत वाहतूक पोलिसांकडून ई-चलन प्रणालीत एमएच २० ऐवजी १५ क्रमांक टाईप झाल्याने आपली गाडी पार्किंगमधूनही न काढलेल्या या महिलेला नियम मोडल्यापोटी २०० रुपये दंडाचा मेसेज आला. त्यापाठोपाठ दंड भरल्याचाही मेसेज आला. या मेसेजमुळे गोंधळलेल्या महिलेने चौकशी केली असता त्यात पोलिसांकडून चूक झाल्याचे समोर आले.

बेशिस्त वाहनचालकांवर ई-चलन प्रणालीव्दारे राज्यभरातील वाहतूक पोलीस कडक कारवाई करत असताना रविवारी (दि.१२) ही घटना घडली. वाहतूक नियम मोडणार्‍यांवर कडक कारवाई करण्यासाठी राज्यभरातील वाहतूक पोलिसांनी ई-चलन पद्धत वापरण्यास सुरूवात केली आहे. एखाद्या वाहनचालकाने राज्यात कुठेही नियम मोडले तरी त्याची नोंद होऊन कारवाईची प्रक्रिया सुरू होते. पावती पुस्तकाऐवजी पोलिसांच्या हाती आधुनिक मशीन देण्यात आले आहेत. त्याद्वारे गाडीचा फोटो, वाहन क्रमांक, परवाना क्रमांक आणि इतर माहिती टाकल्यावर ई-चलन तयार होते. हे चलन वाहनचालकांना मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठवले जाते. मात्र, स्मार्ट तंत्रज्ञान हाताळताना चूक झाल्यावर भलत्याच व्यक्तीलाचा विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो, हेदेखील यातून पुढे आले.

- Advertisement -

रविवारी (दि.१२) सकाळी १०.३० वाजेदरम्यान औरंगाबादची पासिंग असलेली एमएच २० डीएम ०४६१ या दुचाकीला पोलिसांनी संशय आल्याने हटकले. संबंधिक वाहनचालकाकडे लायसन्सची विचारणा केली असता चालकाने लायसन्स नसल्याचे सांगितले. अखेर पोलिसांनी त्याला ई-चलन देत २०० रूपये दंड घेतला. दरम्यान, पोलिसांनी एमएच २० टाईप करण्याऐवजी एमएच १५ टाईप केले. एमएच १५ चा दुचाकी क्रमांक दुचाकी मालकाने आधीच मोबाईल क्रमांकाशी लिंक केला होता. त्यामुळे एमएच १५ च्या दुचाकीमालकाला दंडा झाल्याचा व दंडही भरल्याचा मेसेज आला. या प्रकारमुळे संबंधित दुचाकीमालक महिलेची भंबेरी उडाली. दुचाकी घराबाहेर काढली नसताना दंडाचा मेसेज आला कसा, याबाबत महिलेने महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांच्या संकेतवर ई-चलन क्रमांक टाकून पाहणी केली. त्यात पुरावा म्हणून दुचाकीचा फोटो पाहिला असता दुचाकीचा क्रमांक एमएच २० असल्याचे दिसून आले. त्यातून ई-चलन प्रणाली वापककर्त्याकडून चूक झाल्याचे लक्षात आले. मात्र, नियम मोडला दुसर्‍याने आणि दंडाची पावती त्यांना आल्याने मनस्ताप सहन झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -