कांदा पुन्हा रडवणार; बाजारपेठेतील कांदा लिलाव बंद

करोनामुळे पुन्हा एकदा कांदा रडवणार असल्याची शक्यता आहे.

Lasalgaon
onion
कांदा पुन्हा रडवणार; बाजारपेठेतील कांदा लिलाव बंद

कांद्यावर देखील आता करोनाचे सावट येणार आहे. करोनाच्या संकटामुळे आशियातील कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच कांद्याच्या बाजारपेठेतील कांदा लिलाव बंद राहणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कांदा रडवणार असून शंभरी गाठणार असल्याची शक्यता आहे.

कांद्यावर करोनाचे सावट

चीनमधून येणाऱ्या करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतर करोनाच्या भीतीने कामगारांनी देखील येण्यास नकार दिला. त्यामुळे कांदा आणि धान्याची विक्री कशी करायची? असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर लासलगाव बाजार समितीची बैठक झाली आणि या बैठकीत व्यापाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र दिले. त्यामुळे कांदा आणि धान्य लिलाव लॉकडाऊनपर्यंत अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले. या निर्णयामुळे पुन्हा एकदा कांद्याचा तुटवडा जाणवणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कांद्याचे भाव गगनाला भिडणार असून कांदा पुन्हा एकदा शंभरी गाठणार आहे. पण कांद्याचे आणि धान्याचे लिलाव पूर्ववत कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरु राहणार असल्याचे बाजार सामितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – घाबरु नका! आता फक्त २ रुपयात गहू आणि ३ रुपयात तांदूळ मिळणार


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here