घरमहाराष्ट्रविठुरायाच्या ऑनलाईन दर्शनासाठी मोजा पैसे

विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनासाठी मोजा पैसे

Subscribe

विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनाकरता आता मोजावे लागणार १०० रुपये.

महाराष्ट्रासह देशभरात विठुरायांचे लाखो भाविक आहेत. दरवर्षी ते विठुरायांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पंढरपूरला येतात. मात्र जे भक्त काही कारणास्तव पंढरपूरला येऊन दर्शन घेऊ शकत नाही, असे भक्त घर बसल्या ऑनलाईन विठुरायाचे दर्शन घेऊ शकतात. हे दर्शन याआधी मोफत होते. परंतु आता विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनासाठी १०० रुपये मोजावे लागणार आहे. विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनाला शंभर रुपये आकारण्याचा निर्णय मंदिर समितीने बैठकीत घेतला असून या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत देखील करण्यात आले आहे.

आता गैरप्रकारावर येणार बंदी

देशभरातून येणारे बहुतांश उच्च आणि मध्यमवर्गीय भाविक विठुरायाच्या दर्शनाला येण्यापूर्वी ऑनलाईन बुकींग करुन पंढरपूरमध्ये येत असतात. बुकिंगमुळे आतापर्यंत भाविकांना फुकट झटपट दर्शनाचा लाभ मिळत असे. परंतु काही मंडळी या ऑनलाईन बुकिंग व्यवहारात गैरप्रकार करुन पैसे मिळवायचा उद्योग करायचे. याचसोबत फुकटची घुसखोरी करुन दर्शनासाठी येणाऱ्या VIP लोकांकडूनही पैसे वसुल करण्याचा निर्णय मंदिर समितीने घ्यावा अशी मागणी भाविकांकडून होत होती. त्याप्रमाणे भाविकांच्या मागण्या लक्षात घेऊन मंदिर समितीने ऑनलाईन दर्शनासाठी १०० रुपये आकारले आहेत.

- Advertisement -

८ ते १० कोटी उत्पन्न वाढणार

वर्षभरातील काही गर्दीचे दिवस वगळता ३३० दिवस रोज सरासरी दोन हजार भाविक हे ऑनलाईन दर्शन घेत असतात. यामुळे मंदिराच्या उत्पान्नात वर्षाला ८ ते १० कोटी रुपयांची वाढ होणार आहे. या व्यवस्थेतून मिळणाऱ्या जादा पैशातून भाविकांसाठी विकास कामे करणे मंदिर समितीला शक्य होणार आहे. त्यामुळे मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.


वाचा – देवाचिये द्वारी बडव्यांची अरेरावी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -