घरमहाराष्ट्रऑनलाईन मॅप पडला महागात, पर्यटकांची कार थेट नदीत

ऑनलाईन मॅप पडला महागात, पर्यटकांची कार थेट नदीत

Subscribe

कळसुबाई शिखरावर निघालेल्या पर्यटकांच्या कारला अपघात; एकाचा मृत्यू

अकोले : पुणे येथून कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी निघालेले सतीश सुरेश घुले,(वय ३४, पिंपरी चिंचवड), गुरुसत्य राजेश्वर राक्षेकर (वय ४२), समीर अलोलकर (वय ४४) हे सर्व (कार क्र. एमएच१४ केवाय ४०७९) या गाडीने कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी निघाले होते. मात्र, कोतुळवरून राजूरकडे जाण्याऐवजी मॅपप्रमाणे अकोलेकडे निघाले. मात्र, जुन्या पुलाचा अंदाज न आल्याने तिघेही गाडीसह रात्री पावणेदोनच्या सुमारास थेट नदीत कोसळले.

या अपघातात सतीश सुरेश घुले यांचा मृत्यू झाला. दोघेजण पोहता येत असल्याने पोहून स्वत:ला वाचवू शकले. सर्वांचे नातेवाईक सकाळी कोतुळ येथे पोहचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोतुळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. पोलीस निरीक्षक अजय परमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्यासह तपासी अंमलदार सहायक फौजदार सय्यद, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय अधिकारी मदने यांच्या आदेशाने पोलीस शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व घारगाव पोलीस निरीक्षक सुनील पाटील हेही घटनास्थळी उपस्थित होते.जलसंपदा विभागाने या बंद असलेल्या पुलावर कोणतेही अडथळे अगर सूचना फलक न लावल्यामुळे हा अपघात झाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. परिणामी, योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -