घरमहाराष्ट्रविद्यार्थ्यांना आता ऑनलाईन रस्ते सुरक्षेचे धडे

विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन रस्ते सुरक्षेचे धडे

Subscribe

आजचे विद्यार्थी उद्याचे सुजान नागरिक असल्याने त्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागातर्फे विशेष उपक्रम हाती विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुरक्षेचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणाप्रमाणे विद्यार्थ्यांना ऑनलाईन रस्ते सुरक्षेचे धडे देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यात दरवर्षी होणार्‍या रस्ते अपघातातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. बहुतांश अपघात वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे होतात. आजचे विद्यार्थी उद्याचे सुजान नागरिक असल्याने त्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागातर्फे विशेष उपक्रम हाती विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुरक्षेचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे.

रस्ते सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या विशेष उपक्रमामध्ये शाळेतील किमान एका शिक्षकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्यापन करताना पाठ्यपुस्तकातील नियमांच्या माहितीबरोबरच वाहतुकीसंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना देतील. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावर प्राथमिक शिक्षणाधिकारी,माध्यमिक शिक्षणाधिकारी किंवा प्रशासन अधिकारी महापालिका व उपक्रमशिल शिक्षक यांचा एक गट तयार करण्यात येणार आहे. या गटाला शिक्षण विभागातील अधिकारी व परिवहन विभागातील अधिकारी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण देतील. राज्य स्तरावरून प्रशिक्षित झालेला हा गट जिल्हा स्तरावर साधनव्यक्ती म्हणून काम करील. त्यांना जिल्हा स्तरावर प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी मार्गदर्शन करतील. हा गट प्रत्येक तालुक्यातील पाच उत्साही शिक्षक, गणित, विज्ञान व बी.पी.एड शिक्षकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण देतील. जिल्हास्तरावर प्रशिक्षित गट हा तालुक्यातील प्रत्येक शाळेतील किमान एका शिक्षकास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक दिवसीय प्रशिक्षण देतील. त्यानंतर शिक्षकांमार्फत ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल. या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना उदाहरणासह शिक्षक माहिती देतील. ही माहिती व्हिडीओ आणि पीपीटीच्या माध्यातून विद्यार्थ्यांना देण्यात यावी, असे निर्देश प्राथमिक शिक्षक संचालक द.गो. जगताप यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व नगरपरिषद आणि पालिकेच्या प्रशासन अधिकार्‍यांना दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -