घरमहाराष्ट्र७ डिसेंबरपासून सुरु होतोय 'युवक' महोत्सव

७ डिसेंबरपासून सुरु होतोय ‘युवक’ महोत्सव

Subscribe

विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्राला भेट द्यावी लागणार आहे.

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात येत्या ७ डिसेंबरपासून युवक महोत्सवाला सुरुवात होणार आहे. यंदाचा हा १६ वा महाराष्ट्र राज आंतरविद्यापीठ युवक महोत्सव असून ‘इंद्रधनुष्य- २०१८’ असे या महोत्सवाचे नाव आहे. ७ ते ११ डिसेंबर असा ५ दिवस चालणारा हा महोत्सव असून संपूर्ण राज्यातल्या २० विद्यापीठातील ८०० हून अधिक विद्यार्थी कलाकार यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली आहे.

माहित आहे का?- मुंबई विद्यापीठ उघडणार विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील नवे दालन

विविध कार्यक्रमांची रेलचेल

यंदाच्या १६ व्या युवक महोत्सवाचे आयोजन कुलगुरु प्रा. डॉ. ई वायुनंदर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. ५ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सांसकृतिक शोभायात्रा,सांस्कृतिक कार्यक्रम, लोकसंगीत, लोकनृत्य, प्रश्नमंजुषा, वादविवाद, वक्तृत्व, शास्त्रीय नृत्य, गायन आणि वादन, पाश्चात्य गायन, मृद्कला, रांगोळी, कोलाज, व्यंगचित्रकला, मूकाभिनय, एकांकिका, लघुनाटीका, भित्तीचित्र, स्पॉट फोटोग्राफी, ऑन द स्पॉट पेटिंग अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

इथे करु शकता नोंदणी

विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्राला भेट द्यावी लागणार आहे. गुरुवारी ६ डिसेंबर दुपारी १२ वाजल्यापासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. ७ डिसेंबर सकाळी दहापर्यंत तुम्हाला नोंदणी करता येणार आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

७ डिसेंबर २०१८सकाळी ९.३० ते १०.३०- सांस्कृतिक शोभायात्रा
                     सकाळी ११ वाजता- उद्घाटन सोहळा
                      संध्याकाळी ७.३०वाजता – लोकसंगीत- नृत्य
                       रात्री ८ वाजता – प्रश्नमंजुषा

- Advertisement -

८ डिसेंबर २०१८- सकाळी १० ते दुपारी १२ – वादविवाद स्पर्धा
                  दुपारी २ ते सायंकाळी ५.३० एकल शास्त्री वाद्य स्पर्धा
                   दुपारी १ ते ३.३० वाजता- कोलाज स्पर्धा
                   दुपारी ३.३० ते रात्री ९,३० वाजता – एकांकिका स्पर्धा, पाश्चिमात्य समूह गायन स्पर्धा

९ डिसेंबर २०१८- सकाळी १० ते दुपारी १.३० वाजता- वक्तृत्व स्पर्धा, एकल पाश्चिमात्य गायन
                 सकाळी ९ ते दुपारी १ – शास्त्रीय नृत्य, भिंतीचित्र स्पर्धा, शास्त्रीय वाद्य संगीत स्पर्धा
                 दुपारी १ ते ३.३० – मूक अभिनय , मृद्कला स्पर्धा

१० डिसेंबर २०१८ – सकाळी ९ ते दुपारी १ – समूहगीत गायन

                         सकाळी ९.३० ते ११.३०- नकला स्पर्धा, स्पॉट फोटोग्राफी
                     सकाळी १० ते दुपारी ३ – लघुनाटिका स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, ऑन द स्पॉट पेंटिग स्पर्धा
                     ११ डिसेंबर २०१८- बक्षीस समारंभ आणि समारोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -