Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'शिवसेना म्हणजे नौटंकी सेना'

‘शिवसेना म्हणजे नौटंकी सेना’

शिवसेना म्हणजे नौटंकी सेना आहे', अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली आहे.

Related Story

- Advertisement -

‘मुंबई महानगर पालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार असून त्यासाठी आता पासूनच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना राजकारण करत आहे. त्यामुळे शिवसेना म्हणजे नौटंकी सेना आहे’, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली आहे.

नामांतरणाचा विषय म्हणजे शिवसेनेचे नाटक

‘औरंगाबादचं ‘संभाजीनगर’, असं नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण सध्या तापलं आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर येताच शहराच्या नामांतराच्या मागणीनं उचल खाल्ली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच शिवसेनेनं नामांतराची जोरदार मागणी केली आहे. त्यामुळे नामांतरणाचा विषय म्हणजे शिवसेनेचे नाटक असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

गरिबांना मोफत लस मिळाली पाहिजे

- Advertisement -

कोरोनावर लस आली असून या लसीला देशात परवानगी मिळताच त्याचे लसीकरण केले जाणार आहे. मात्र, ही लस महाराष्ट्र राज्यात गोर-गरिबांना मोफत द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे राज्यातील बऱ्याच गरजू नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.


हेही वाचा – येत्या १० दिवसात देशात लसीकरणाला होणार सुरुवात – केंद्रीय मंत्रालय


- Advertisement -