घरमहाराष्ट्र'आयाराम, गयाराम, जय श्री राम'च्या विधानभवनात घोषणा

‘आयाराम, गयाराम, जय श्री राम’च्या विधानभवनात घोषणा

Subscribe

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी नवनिर्वाचित गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील विधान भवनात येताच 'आयाराम, गयाराम, जय श्रीराम',चा नारा देण्यास सुरुवात केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिले संसदीय अधिवेशन दिल्लीत सुरू झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील शेवटचे विधानसभा अधिवेशन मुंबईत सुरू झाले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी नवनिर्वाचित गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखेपाटील विधान भवनात येताच आयाराम, गयाराम, जय श्रीराम‘,चा नारा देण्यास सुरुवात केली. तसेच आले रे आले चोरटे आले‘,असे म्हणत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे विकासाची सगळी स्वप्ने भंग, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारात दंग‘, अशाही घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

विरोधक आणि मुख्यमंत्री

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि मुख्यमंत्री आमने सामने पाहायला मिळाले. तसेच गेली साडेचार वर्षे जे विरोधी बाकांवर बसले होते ते आज भाजपा सरकारचे मंत्री म्हणून समोर आले. विखे पाटील समोर येताच विरोधकांनी आयाराम, गयाराम, जय श्री रामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी काँग्रेसराष्ट्रवादीमधून आलेल्या नेत्यांना मंत्रीपद बहाल केले. या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांनी पॉईंट ऑफ ऑर्डरचा मुद्दा उपस्थित करत एकाच टर्ममध्ये एखाद्या आमदाराने राजीनामा देऊन पक्षांतर केले आणि तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याला मंत्रीपद द्यावे का? याबाबत नियम आहेत की हे लोकशाहीविरोधी आहे?, याबाबत शंका उपस्थित केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याचीही मागणी केली. ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड योग्य त्या प्रक्रियेप्रमाणेच झाली आहे, असे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेनेच्या निष्ठावंतामध्ये अस्वस्थता; अजित पवारांनी ठेवले वर्मावर बोट

हेही वाचा – मुख्यमंत्री महोदय आता विजय वडेट्टीवारांना तरी घेऊ नका – अजित पवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -