weather Alert: मुंबई, मध्य महाराष्ट्रासह ‘या’ भागात देखील ऑरेंज अलर्ट

या दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

पुणे शहराला शनिवारी दुपारी अवकाळी मुसळधार पावसाने झोडपले.शहरातील कोथरूड, कर्वेनगर,वारजे, कात्रज, पाषाण, सिंहगड रस्ता आदी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर रविवार आणि सोमवारसाठी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात उल्लेखनीय बदल झाले असल्याने हा अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने असे सांगितले की, सोमवारी मुंबईसह संपुर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये.

या दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. १२ ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. १३ ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. १४ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या काळात ताशी ७० किमी वेगाने वारे वाहणार आहे.

शनिवारी सकाळी मुंबईत आकाश स्वच्छ होते. दुपारी तर रखरखीत ऊनं पडले होते. मात्र दुपारी दोन ते तीननंतर मुंबई शहर आणि उपनगरात मोठया प्रमाणावर पावसाचे ढग दाटून आले. ढगांचा गडगडाट सुरु झाला. मुंबईत चार वाजण्याच्या सुमारास बहुतांश ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी लागण्यास सुरुवात झाल्याचे दिसतेय.


महाराष्ट्रातील Unlock संदर्भात आरोग्यमंत्री टोपेंनी दिले स्पष्ट संकेत; म्हणाले…