७५ वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानाने मिळाले जीवदान

मुंबईत ६८ व्या अवयवदानाची नोंद गेल्या दहा महिन्यांत करण्यात आली आहे. या अवयवदानामुळे ५ जणांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.

Maharashtra
organ donation made by 75 years old male

मुंबईत गेल्या दहा महिन्यांत ६८ व्या अवयवदानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे यंदा अनेक लोकांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या आठवड्यातील शुक्रवारी, रविवारी आणि सोमवारी म्हणजेच १४ ऑक्टोबर या तीन दिवशी तीन अवयवदान करण्यात आले. विशेष म्हणजे एका ७५ वर्षीय व्यक्तीचे अवयवदान केले आहे. मीरारोडच्या उमराव वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हे अवयवदान पार पडलं आहे. या व्यक्तीच्या अवयवदानामुळे एका व्यक्तीला जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.

५ जणांना मिळाले जीवनदान

विभागीय अवयवदान प्रत्यारोपण समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत शुक्रवारी ६६ वं तर रविवारी ६७ अवयवदान करण्यात आले. शुक्रवारी करण्यात आलेले अवयवांमध्ये हृदय, यकृत, फुफ्फुस आणि दोन मूत्रपिंड हे दान करण्यात आले. यामुळे ५ जणांना जीवनदान मिळण्यास मदत झाली आहे. तर, रविवारी करण्यात आलेले ६७ व्या अवयवदानात ७५ वर्षीय पुरुषाने यकृत, डोळे आणि मूत्रपिंडदान केले. पण, यातील मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्यासाठी योग्य नसल्याचे सांगण्यात आले.

२७ वर्षीय तरुणाने यकृत आणि किडनी केलं दान  

दरम्यान, सोमवारी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ६८ वं अवयवदान झालं आहे. २७ वर्षीय तरुणाने यकृत आणि किडनी दान केल्या आहेत. हृदय आणि फुप्फुस हे अवयव देखील दान करण्यात आले होते. पण, काही कारणास्तव ते दान करता आले नसल्याचं झेडटीसीसीकडून सांगण्यात आलं आहे.