आज मध्य रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक

भुसावळ-सीएसएमटी,साईनगर शिर्डी एक्स्प्रेस रद्द

Mumbai

मध्य रेल्वे मार्गावरील सायन ते कुर्ला स्थानकांदरम्यान नवीन पादचारी पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या पुलाचा गर्डर शनिवारी रात्री टाकण्यात येणार आहे. परिणामी सायन ते कुर्ला स्थानकांदरम्यान सर्वच रेल्वे मार्गावर स्पेशल ब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकलच्या वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

रात्री १ ते पहाटे ४ .३० वाजेपर्यंत हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द आणि मेन लाईनवर घाटकोपर-कुर्ला ते माटुंगा दरम्यान अप-डाउन धिमा,जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान सीएसएमटीहून कर्जतकरिता शेवटची लोकल रात्री १२.२५ वाजता ठाणे स्थानकातून सीएसएमटीकरिता अप धिमी लोकल रात्री १२.२३ तर रविवारी पहाटे सीएसएमटी स्थानकातून डाऊन दिशेला पहिली लोकल पहाटे ४.४८ वाजता कर्जतकरिता आणि पहिली अप ठाणे-सीएसएमटी लोकल पहाटे ४.५६ वाजता चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर शेवटची सीएसएमटी-पनवेल डाऊन लोकल रा.१२.२४वा, रविवारी पहाटे पहिली सीएसएमटी-पनवेल लोकल पहाटे ४.५२वा आणि पनवेल-सीएसएमटी लोकल पहाटे ४.२९वाजता सुटणार आहे.

या विशेष ब्लॉकदरम्यान ५११५४ भुसावळ-सीएसएमटी,५१०३४ साईनगर शिर्डी-सीएसएमटी गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. १०१०३ सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस रविवारी सकाळी १० वाजता, ११३०१ सीएसएमटी-बॅगलोर उद्यान एक्सप्रेस स.१०.३०वा सुटणार आहेत.११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस, १२१३४ मंगलोर-मुंबई एक्सप्रेस,१२११२ अमरावती-मुंबई एक्सप्रेस रविवारी दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. तसेच अप मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २ ते ३ तास उशिराने पोहोचणार आहेत.