घरमहाराष्ट्रमहागाईच्या झळीपासून रेशीम धागा दूर!

महागाईच्या झळीपासून रेशीम धागा दूर!

Subscribe

पब्जी राख्यांची बाजारात चलती

रक्षाबंधनाला अद्याप एक आठवडा बाकी असला तरी येथे राख्यांनी सजलेल्या दुकानांतून खरेदीसाठी आतापासूनच गर्दी झालेली पहावयास मिळत आहे. विविध आकाराच्या, रंगांच्या राख्या उपलब्ध असूनही पब्जीच्या राख्यांना विशेष पसंती दिली जात आहे. यंदा राख्यांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली नसल्याने भावा-बहिणीचे अतूट नाते जपणारा रेशीम धागा महागाईच्या झळीपासून दूर असल्याचे दिसते.

दरवर्षी बाजारात विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी येतात. यावेळी तरुणाईला असलेले पब्जीचे वेड लक्षात घेऊन या खेळाचे चित्र असलेल्या राख्या लक्षवेधक ठरत आहेत. आपल्या भावांचे हेच वेड लक्षात घेऊन अनेक बहिणी पब्जी राख्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. राखी विक्रेते अभिजीत जनरल स्टोर्सच्या मालकांनीही याला दुजोरा दिला. दुकानांच्या दर्शनी भागात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. १ ते १५० रुपयांपर्यंत किमतीच्या राख्या बाजारात उपलब्ध असून, चंदेरी व सोनेरी मुलामा असलेल्या राख्यांशिवाय छोटा भीम, मोटू-पतलू, डोरेमन या बच्चे कंपनीसाठीच्या राख्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या आहेत. गोंडा असलेल्या राख्यांनाही विशेष पसंती दिली जात आहे.

- Advertisement -

देवदेवतांची चित्रे, तसेच विविध प्रकारचे संगीत, गाणी, लाईटिंग असलेल्या राख्या आकर्षण ठरत असून, डायमंडच्या राख्याही भाव खाताना दिसत आहेत. राखी विक्री दुकानांतून महिलांची खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येते. परगावी असणार्‍या भावांना राखी पाठविण्यासाठी कुरिअर, पोस्ट सेवेचा आधार घेतला जात आहे. राखी वेळेत पोहचण्यासाठी आम्ही त्या लवकर खरेदी करीत असल्याचे काही महिलांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -