पंढरपूर: यंदा कार्तिकीला येणाऱ्या दिंड्या, पालख्यांना बंदी

pandharpur kartiki ekadashi wari cancelled for coronavirus
पंढरपूर: यंदा कार्तिकीला येणाऱ्या दिंड्या, पालख्यांना बंदी

पाडव्याच्या मुहूर्तावर १६ नोव्हेंबरला राज्यातील सर्वधर्मीय मंदिरे खुले करण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली. यानंतर ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत केले गेले. आता मंदिरात कोरोना व्हायरस संबंधित सर्व नियम पाळून भाविकांना दर्शन दिले जाते आहे. पण आता पंढरपुरात कार्तिकीला येणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांवर राज्य सरकारने बंदी घातली आहे.

२६ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. या दिवशी पंढरपुरात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातून शेकडोंच्या संख्येने दिंड्या आणि पालख्या येत असतात. पण या सर्व सोहळ्यांना राज्य सरकारने बंदी घातली आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्या अनुषंगाने राज्याचे विधी आणि न्याय विभागाचे कार्यासन अधिकारी सु.प.साळुंखे यांनी निर्देश दिले आहेत.

पंढपूरच्या वारीत लाखोंच्या संख्येन वारकरी हजेरी लावत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी एकत्र जमले तर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होवू शकतो. त्यामुळे वारीला येणाऱ्या वारकऱ्यांचा जीवाला धोका पोहोचू शकतो. ही सर्व बाब लक्षात घेऊन पंढपुरात कार्तिकीला येणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांना बंदी घातली आहे. यापूर्वी देखील आषाढीवारीला कोरोना संदर्भातले अशाप्रकारचे नियम लावण्यात आले होते आणि आषाढीवारी प्रातिनिधिक स्वरुपात साजरी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे याही वर्षी प्रातिनिधिक स्वरुपात कार्तिकी वारी साजरी होणार असून सध्या कार्तिकी साजरी करण्याच्या हालचाली वारकरी संप्रदायात सुरू आहे.


हेही वाचा – पुनश्च हरी ओम: ठाकरे सरकार मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वेसेवा बंद करण्याच्या तयारीत?