घरमहाराष्ट्रपंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आमने-सामने

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आमने-सामने

Subscribe

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

माहिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बुधवारी संध्याकाळी परळीच्या व्यापारी पेठांमध्ये समोरासमोर आले. त्यावेळी दोघांनी आपसातील सर्व मतभेद विसरुन एकमेकांना हसतमुखाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंडे बंधु-बघिणींमधील संबंध ताणले गेले होते. दोघेही भाषणांमधून एकमेकांवर टीका करत होते. मात्र, बुधवारी संध्याकाळी जेव्हा अचानकपणे दोघे समोरासमोर आले, तेव्हा दोघांनी हसतमुखाने एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – विरोधक माझी बदनामी करतायत – धनंजय मुंडे

- Advertisement -

परळीमध्ये चर्चेचा विषय

बुधवारी लक्ष्मीपूजन असल्याकारनाने बीडची व्यापारी पेठा गर्दी आणि उत्साहाने भरुन गेल्या होत्या. प्रत्येकजण एकमेकांना दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या शुभेच्छा देत होते. याच शुभेच्छा देण्यासाठी पंकजा मुंडे व्यापारी पेठात गेल्या होत्या. नेमकं त्याचवेळी धनंजय मुंडे देखील व्यापारीपेठांमध्ये व्यापाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले. शुभेच्छा देताना अचानक एकाच दुकानात दोघे भाउ-बहिण समोरासमोर आले. त्यामुळे दोघांचे कार्यकर्ते एकमेकांकडे बघायला लागले. आता काय होणार? असा प्रश्न प्रत्यकाच्या मनात पडला. मात्र, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांमधील सर्व मतभेद विसरुन हसतमुखाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे यांच्याशी हस्तांदोलन केले. एरवी राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे भाऊ-बहिन एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत, ही बाब परळीच्या लोकांसाठी आश्चर्याची आहे. त्यामुळे सध्या परळीमध्ये याच गोष्टीची चर्चा रंगलेली आहे.


हेही वाचा – पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना ‘धस’का दम!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -