घरमहाराष्ट्रगुन्हा दाखल झालेल्या पंकजा मुंडे यांचा पलटवार; म्हणाल्या, आता हे सत्र माझ्यापर्यंत...

गुन्हा दाखल झालेल्या पंकजा मुंडे यांचा पलटवार; म्हणाल्या, आता हे सत्र माझ्यापर्यंत आलं

Subscribe

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी यंदा ऑनलाईन दसरा मेळावा घेतला असून त्यांच्यासह तब्बल ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली असून ट्विटर पोस्टच्या माध्यमातून पलटवार केला आहे. गुन्हे दाखल करण्याचे सत्र माझ्यापर्यंत आलं आहे तर…, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. गेल्या रविवारी दसऱ्यांच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथे ऑनलाईन दसरा मेळावा घेतला होता. परंतु अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये ४० ते ५० जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

काय म्हटले आहे ट्विटमध्ये 

परवानगी घेऊन गेले असतानाही गुन्हा दाखल झाला आहे. आधी माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आता तेच सत्र माझ्यापर्यंत आलं आहे.

- Advertisement -

यांच्यावर गुन्हे दाखल 

पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, भाजप राज्यसभा सदस्य भागवत कराड, आमदार मेघना बोर्डीकर, मोनिका राजळे, माजी आमदार भीमराव धोंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता गोल्हार, पाटोदा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा लांबरुड, सरपंच राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे व अन्य अशा ५० जणांवर पाटोद्यातील अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. असे असताना मेळावा घेऊन गर्दी करत जमावबंदी आदेश मोडल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष शाखेचे कर्मचारी किसन सानप यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल झाले आहेत, असे सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा –

जाणून घ्या, येत्या ४ दिवसात बदलणारे LPG गॅस सिलेंडरचे नियम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -