घरताज्या घडामोडीपंकजा मुंडेचे बंड! सस्पेन्स कायम

पंकजा मुंडेचे बंड! सस्पेन्स कायम

Subscribe

राज्याचे लक्ष गोपीनाथ गडाकडे

मला जे काही बोलायचे आहे, ते उद्या बोलेन. काय तथ्य आहे. कोणी काय निकष लावले आहेत, त्यावर उद्या स्पष्टता येईल, असे सांगताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी परळी येथील गोपीनाथ गडावर काय होणार याचा सस्पेन्स वाढवला आहे. मात्र बंडाचा झेंडा उभारणार्‍या पंकजा मुंडे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे बंड शमवण्यात राज्यातील भाजप नेत्यांना यश आले असल्याचे समजते. पंकजा मुंडे किंवा एकनाथ खडसे यांच्या पैकी एकाला भाजप प्रदेशाध्यक्षपद तर दुसर्‍याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद देण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी आपण भाजपतच राहणार अशा आणाभाकाही घेतल्या आहेत. मात्र गुरुवारी गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे नेमकी काय घोषणा करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच भाजपतील नाराज नेतेही गोपीनाथ गडावर असणार आहेत. त्यामुळे गुरुवारच्या गोपीनाथ गडावरील मेळाव्याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची गुरुवारी जयंती आहे. जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर दरवर्षीप्रमाणे यावेळीही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते एकनाथ खडसे राम शिंदे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी माळी, धनगर, वंजारी समुदायाला एकत्र आणत ‘माधव’चा प्रयोग केला होता. आता पंकजा या समुदायांसोबतच बंजारा आणि राजपूत यांचीदेखील मोट बांधण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते. भाजपावर दबाव आणण्यासाठी पंकजा मुंडे ‘माधवबरा’(माळी, धनगर, वंजारी, बंजारा, राजपूत) या समुदायांना एकत्र आणू शकतात. उद्या गोपीनाथ गडावरुन याबद्दलची घोषणा होऊ शकते.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे भाजपच्या राज्यातील नेतृत्त्वावर नाराज असल्याचे दिसून आले आहे. एकनाथ खडसे यांनी तर आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. इतकंच नव्हेतर खडसे यांनी पक्षातील ओबीसी नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्नही केला होता. तर नाराज पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपचे कमळ चिन्ह हटवले होते. तसेच १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावरून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

या घटनाक्रमांमुळे राज्यातील भाजप नेते या दोन नेत्यांच्या नाकदुर्‍या काढण्यास सरसावले होते. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यापैकी एकाला प्रदेशाध्यक्षपद तर दुसर्‍याला विधान परिषद विरोधी नेतेपद देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे या नेत्यांचे बंड क्षमले असले तरी मुंबईत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी पाठ फिरवल्याने त्या नाराज आहेत का हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

- Advertisement -

शिवसेनेसाठी भाजपची दारे खुली

चंद्रकांत पाटील यांचा आशावाद

महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिवसेनेला कौल दिला आहे. शिवसेनेसाठी भाजपची दारे खुली होती आणि यापुढेही राहतील. या दोन्ही पक्षांनी एकत्र राहावे, अशीच आमची आशा आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. शिवसेना-भाजपची गेल्या ३० वर्षांपासून मैत्री आहे. हे दोन्ही पक्ष नैसर्गिक मित्र आहेत. आमच्या रक्तात हिंदुत्त्वाचा समान धागा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्र राहायला हवे, हीच आमची मनापासून इच्छा आहे.

महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेनेला एकत्र सरकार चालवण्यासाठी जनादेश दिला आहे. त्यामुळेच आम्ही अजूनही आशावादी आहोत. मात्र प्रत्यक्षात तसं काही होणार की नाही, हे मला माहीत नाही. शिवसेनेसोबत चर्चेसाठी आमचे दरवाजे नेहमीच खुले होते आणि राहतील. आम्हाला कोणताही अहंकार नसल्याने आम्हीच त्यासाठी पुढाकार घेतला होता, असेही पाटील म्हणाले.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना शिवसेना-भाजप केव्हाही एकत्र येतील. मला खात्री आहे, योग्यवेळ येताच माननीय उद्धवजी योग्य भूमिका घेतील, असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही, त्यावेळी मते गोळा करण्याच्या निमित्ताने, पक्ष विस्ताराच्या दृष्टीने अशा गोष्टी घडतात. तसे सध्या शिवसेना आणि भाजपाच्याबाबतीत झाले आहे. याचा अर्थ आम्ही भाजपबरोबर कधीच जाणार नाही, असे नाही. योग्य वेळ येताच माननीय उद्धवजी योग्य भूमिका घेतील, अशी मला खात्री आहे, असेही जोशी म्हणाले होते. त्यानंतर बुधवारी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेना-भाजपत पुन्हा काही शिजतेय का, असा प्रश्न आता विचारण्यात येऊ लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -