घरमहाराष्ट्रलसीशिवाय शाळा, कॉलेज सुरू करण्यास पालक, शिक्षकांचा विरोध

लसीशिवाय शाळा, कॉलेज सुरू करण्यास पालक, शिक्षकांचा विरोध

Subscribe

केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर राज्य सरकारने दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा विचार करत आहे.

केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर राज्य सरकारने दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा विचार करत आहे. मात्र पालक, विद्यार्थी व शिक्षक संघटनांकडून लस येत नाही तोपर्यंत शाळा सुरू करण्यात येऊ नये अशी विनंती राज्य सरकारला करण्यात येत आहे.

लस आल्याशिवाय शाळा, कॉलेज सुरु करण्यास पालकांचा विरोध आहे. डिसेंबरमध्ये लस आल्यास जानेवारीमध्ये परिस्थिती पाहून शाळा, कॉलेज रितसर सुरू करावेत. लस आल्यानंतर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना लस देण्यात यावी. शाळा सुरू झाल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या चार महिन्यात अभ्यासक्रम भरून काढावा. तसेच सहामाही परीक्षा किंवा सत्र परीक्षा घेऊ नयेत. थेट वार्षिक परीक्षा आणि दहावी, बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यावेळची परिस्थिती पाहून घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे २०२०-२१ च्या पहिल्या शैक्षणिक वर्षात राहिलेला अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये भरून काढण्यात यावा. पुढील शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र ऑनलाईन शिक्षण हे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नाही. शिक्षण शहरी भागामध्ये ५० टक्के तर ग्रामीण भागात फक्त ३५ टक्के विद्यार्थ्यांपर्यंतच ऑनलाईन शिक्षण पोहचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ आणि पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ही दोन्ही एकत्रित करावीत. त्यासाठी मुख्य सणांच्या सुट्ट्या वगळून अन्य सट्ट्या कमी कराव्यात. महापुरुषांच्या जयंतींनाही शाळा, कॉलेज चालू ठेवावीत. अभ्यासक्रम कुठेही कमी न करता तो पुढील काळात भरून काढण्यात यावा, अशा सूचना शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी राज्य सरकारला पत्राद्वारे केल्या आहेत.

शाळा, कॉलेज सुरू करताना सर्वांशी विचार विनिमय करून निर्णय घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत जानेवारीपूर्वी शाळा, महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करू नयेत. तोपर्यंत शिक्षकांना सर्व अशैक्षणिक कामातून वगळून वर्क फ्रॉम होमची मुभा द्यावी. ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही कपिल पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -