पार्थ पवारांचे दुसरे भाषणही चर्चेत; पंतप्रधान मोदींचा केला एकेरी उल्लेख

आपल्या पहिल्या भाषणावर टीका झाल्यानंतर पार्थ पवार यांनी त्यांचे दुसरे भाषण एकदम दणक्यात केले. पण भाषणाच्या ओघात त्यांनी मोदींचा एकेरी उल्लेख केला.

Pimpri Chinchwad
parth pawar second speech
मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार

मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत (शनिवारी) बोलत होते. ‘तो एक मोदी’ गुजरात भारतभर मांडू शकतो तर आपण पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रभर का नाही मांडू शकत? असे पार्थ पवार म्हणाले. तसेच त्यांनी आजोबा शरद पवार यांना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे? असेही यावेळी पवार यांनी यावेळी नमूद केलं.

पार्थ अजित पवार हे त्यांच्या पहिल्या भाषणामुळे चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्या भाषणाला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले होते. त्यानंतर वडगाव मावळ येथे माध्यमांशी बोलताना ‘आपण कमी बोलतो आणि जास्त काम करतो’, असा टोला विरोधकांना त्यांनी लगावला होता. त्यानंतर त्यांच्यात भाषण शैली आणि वक्तृत्व असल्याचं बोललं जातं होत. परंतु (शनिवारी) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा एकेरी उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

पार्थ पवार यांनी आपल्या दुसऱ्या भाषणात केली चूक | मोदींचा केला एकेरी उल्लेख

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಮಾರ್ಚ್ 24, 2019

 

तो एक मोदी…

पार्थ अजित पवार हे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना म्हणाले की, पिंपरी-चिंचवडचा विकास महाराष्ट्रभर मांडला नाही, असे माझा मित्र म्हणत आहे. ‘तो एक मोदी’ गुजरात भारतभर मांडू शकतो तर पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रभर का मांडू शकत नाही? तेच मला कळत नाही” भाषण करण्याच्या ओघाच्या भरात पार्थ अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला. पुढे ते म्हणाले, गेल्या दहा दिवसांत मला काहीच कळत नाही की काय चाललंय खूप प्रेम कार्यकर्त्यानी दिलं आहे.

मुंबईत उगाच वेळ घालवला

“मी १८ वर्षांचा असताना शहरात काम सुरू केलं असतं तर लग्न पण झालं असतं. उगाचच मुंबईमध्ये वेळ घालवला, असंही पार्थ यावेळी म्हणाले. आता आपल्याकडे केवळ ३५ दिवस राहिले आहेत. आपल्याला सर्वांना एकत्र राहून काम करायचं आहे. खासकरून तरुण वर्गाला आपल्या शहरातील विकास दाखवा ते कन्फ्युज आहेत. मतभेद विसरून जाऊयात आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे, अस पार्थ पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here