घरमहाराष्ट्रपार्थ यांना अजून कष्ट करावे लागतील; भावाचा सल्ला

पार्थ यांना अजून कष्ट करावे लागतील; भावाचा सल्ला

Subscribe

'पार्थ यांना आणखी कष्ट करण्याची गरज आहे, त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे' असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे वृत्त समोर येताच, ‘पवार साहेबांनी नातवासाठी माघार घेतली’ अशा चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, शरद पवार यांचा दुसरा नातू रोहित पवार यांनी मात्र या चर्चांचे खंडन केले. ‘पार्थसाठी मावळमधील कार्यकर्ते आग्रही होते आणि राजकारणात शेवटी जनतेचेच ऐकावेच लागते. येथे पवार साहेबांनीही ही जनतेचेच ऐकले आहे’, अशी प्रतिक्रिया रोहित यांनी दिली. इतकंच नाही तर शरद पवारांनी माघार घेण्याच्या निर्णयावर फेरविचार करुन स्वत:च निवडणूक लढवावी अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. दुसरीकडे माध्यमांशी बोलतेवेळी रोहित पवार यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीवरही आपली स्वतंत्र्य प्रतिक्रिया दिली. निवडणूक लढवण्यापूर्वी त्यांनी आपला भाऊ पार्थ याला मार्ददर्शनपर काही सल्लेही दिले.

‘मावळ लोकसभा मतदारसंघातील पार्थ पवार यांच्या उमेदवारीविषयी माझं काहीचं म्हणणं नाही. मात्र, माझ्या मते त्यांना आणखी कष्ट करण्याची गरज आहे. त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यादृष्टीने अधिक मेहनत करण्याची गरज आहे कारण निवडणूक सोपी नाही’, असं मत रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. रोहित पुढे म्हणाले की, ‘आजवर शरद पवार साहेबांच्या राजकारणावर जितक्या प्रमाणात टीका झाली आहे, त्याहून अधिक लोक त्यांच्या राजकारणाचा सन्मान करणारे आहेत. पवार साहेबांनीही सर्वसामान्यांच्या मागण्यांना नेहमीच मान देऊन राजकारण केले आहे. म्हणूनच मावळवासीयांच्या म्हणण्याला मान देऊन आणि पार्थ यांच्यासाठी स्थानिकांचा आग्रह ओळखूनच पवार साहेबांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आम्हा सर्वांनाच आदर आहे’.

- Advertisement -

दरम्यान, स्वत: विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबतही रोहित यांनी अनुकूलता दर्शवली असून, ‘जनतेची इच्छा असेल तर मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा जरूर विचार करेन,’ असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -