विजय शिवतारेंनी उडवली खिल्ली; पार्थ पवार म्हणतात त्यांना बोलू द्या..

Pimpri Chinchwad
parth pawar slams mla vijay shivtare
विजय शिवतारे यांच्या टीकेला पार्थ पवार यांचे उत्तर

मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार पार्थ अजित पवार यांची खिल्ली उडवली होती. यावर पार्थ पवार यांनी ते राजकारण करत आहेत त्यांना टीका करू द्या, असे म्हणत अधिक बोलण्यास टाळलं ते पिंपरी-चिंचवड येथील कामगार मेळाव्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नगरसेवक उपस्थित होते.

राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी वडगाव मावळ मधील शिवसेनेच्या जाहीर सभेत पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधत खिल्ली उडवली होती. ते म्हणाले होते की, काल-परवा पर्यंत मुंबई, पुणे, गोवा येथे पबमध्ये नाचणारा तरुण रथयात्रेत नाचू लागतो. काय जादू आहे या लोकशाहीची विदेशी गाड्यात फिरणारा तरुण ट्रेनमध्ये बसत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतात जात आहे, असे म्हणत राज्यमंत्री शिवतारे यांनी पार्थ ची खिल्ली उडवली होती.

तर अजित पवार यांना बारामतीचा जनरल डायर, असा उल्लेख करत टीका केली होती. यावर पार्थ यांना विचारले असता या टीकेला कार्यकर्ते उत्तर देतील, असे पार्थ म्हणाले. दरम्यान, आज पिंपरी-चिंचवड शहरात कामगार मेळाव्याचे आयोजन केले असता अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ हे एका मंचावरून भाषण करतील, असे वाटत असताना अजित पवार यांनी भाषण करत सभेतून काढता पाय घेतला. त्यानंतर पार्थ अजित पवार यांनी सभेला उपस्थिती लावली. पार्थ हे सभेला संबोधित करतील, अशी आशा कार्यकर्त्यांना होती. परंतु, तस काही झालं नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here