घरमहाराष्ट्रपार्थ पवारांची उमेदवारी अजूनही तळ्यात-मळ्यात!

पार्थ पवारांची उमेदवारी अजूनही तळ्यात-मळ्यात!

Subscribe

शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांच्यासाठी मावळ मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, पार्थ पवार यांची उमेदवारी अध्यापही निश्चित नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी नऊ वाजता पार्थ पवार यांनी कार्ला गडावरील एकविरा देवीचे दर्शन घेतले. मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ विधानसभा मतदारसंघ आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण आणि पनवेल हे विधानसभा मतदारसंघ येतात. याशिवाय, रायगड जिल्ह्यात एकविरा देवीवर श्रद्धा असणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पार्थ पवार यांनी एकविरा देवीचे दर्शन घेतल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, अजित पवार यांनी पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या निवडणूक लढवण्याच्या इच्छेवर पाणी पडणार, असे संकेत दिसत आहे..

हेही वाचा – नातवासाठी आजोबांची माघार, पवार माढ्यातून लढणार नाहीत!

- Advertisement -

‘पार्थची उमेदवारी अजून निश्चित नाही’

अजित पवार यांनी बुधवारी मावळ लोकसभा मतदार संघाच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये हजेरी लावली. यावेळी पवार म्हणाले की, ‘पार्थची उमेदवारी अद्याप निश्चित नाही. अंतिम यादी जाहीर झाल्यावर पार्थचे नाव जाहीर होईल. पार्थच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये आलेलो नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४८ जागा निवडून याव्या यासाठी आलो आहे.’ यापुढे अजित पवार म्हणाले की, ‘जास्तीत जास्त समविचारी लोकांना एकत्र घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे तीन पक्ष शंभर टक्के एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातात, हे सत्य आहे. आता बाकीच्या बद्दलची चर्चा सुरु असून एक-दोन दिवसांत हे चित्र स्पष्ट होईल.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -