घरमहाराष्ट्रमावळमध्ये पार्थ पवारांचे दौरे तेजीत

मावळमध्ये पार्थ पवारांचे दौरे तेजीत

Subscribe

मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून आता पवार घराण्यात वाद टोकाला पोहचू लागले आहेत. या मतदार संघातून पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जाणार नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर केले असताना दुसरीकडे मात्र पार्थ पवार हे संपूर्ण मावळ मतदार संघात दौरा करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आता संभ्रमाचे वातावरण आहे.

चार महिन्यांपासून पार्थ पवार यांचे नाव सातत्याने चर्चेला येत आहे. मावळच्या कार्यकर्त्यांनी पार्थच्या नावाचा आग्रह धरल्याचे सांगत अजित पवार यांचे निकटवर्तीय सुनील तटकरे यांनीही अप्रत्यक्षपणे पार्थ यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली. पार्थ पवारांचा मावळमधील निवडणूक दौरा जोरात आहे. दिवंगत नेते आर.आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांचेही नाव या मतदारसंघासाठी पुढे आले आहे. मात्र पवारांच्या या वक्तव्यानंतरही पार्थचे मावळमधील संपर्क दौरे थांबलेले नाहीत. त्यामुळे पार्थ आजही निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

अजित पवार आणि त्यांच्या घरातील सर्वांनाही पार्थ यांनी मावळच्या मैदानात उतरावे असे वाटत आहे. मात्र पवारांच्या विधानानंतर पक्षाने स्मिता पाटील यांच्या नावाची चाचपणी सुरू केली आहे. सुप्रिया सुळे यांनीही शरद पवारांच्या मताला दुजोरा देत पार्थच्या उमेदवारीवर फुल्ली मारली. पक्षातून इच्छूकांची यादी जास्त असल्याने पुढील पाच वर्षांनंतर विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारीबाबत सुरू असलेला गोंधळ यामुळे राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदारसंघातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या संभ्रमात आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या विधानानंतरही पक्ष शेवटी पार्थ पवार यांच्याच पदरात मावळची सुभेदारी टाकणार अशी शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -