एल्गार परिषदेची बनावट कागदपत्रे पवारांनी सार्वजनिक करावीत

vanchit bahujan aghadi factor congress ncp lost 27 seats in akola district
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
Advertisement

एल्गार परिषदेची बनावट कागदपत्रे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सार्वजनिक करावीत, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट आहे. या प्रकरणातील संबंधित कागदपत्रे बनावट असून तयार करण्यात आली आहे, असे पत्र शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले होते. यावर आता प्रकाश आंबेडकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट आहे. या प्रकरणातील संबंधित कागदपत्रे बनावट असून तयार करण्यात आली आहे, असे पत्र शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले होते. ही कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी आणि केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा, त्याचबरोबर केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबतोय, हे या कागदपत्रांवरून उघडकीस येईल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

एल्गार परिषदेचे आयोजन सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश पी.बी. सावंत यांनी केले होते. केंद्रात आरएसएस, बीजेपीचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम केले. एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. नको असलेले कायदे या ठिकाणी लावण्यात आले. हे सुरू असतानाच, राज्यात देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे की, एल्गार प्रकरण बोगस असून, संबंधित कागदपत्रे बनावट तयार करण्यात आली आहे. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे, तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे याची माहिती लोकांना होईल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीच्या विनंतीला शरद पवार हे मान देतील, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली आहे.