पवारांची घोषणा माढातूनच लढणार

Mumbai
sharad pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

 टेंभुर्णी राष्ट्रवादीचा माढातील उमेदवार कोण, हा प्रश्न आता संपल्यात जमा आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:च आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. माढा मतदारसंघातील टेंभुर्णी येथील सभेत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाला आपण दुजोरा देण्याचे ठरवले आहे असे म्हणत उमेदवारीचे संकेत दिले.

शरद पवार गुरुवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. त्यांच्यासोबत माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील देखील होते. टेंभुर्णी येथे जाहीर सभेला संबोधित करताना पवारांनी आपल्या उमेदवारी बाबत भाष्य केले. यावरून ते माढातून लढणार हे स्पष्ट झाले. शरद पवार यांचा आम्ही पराभव घडवून आणू ,असे भाकीत भाजपने वर्तवले आहे. पवार यांच्या मनाचा कोणालाच थांग कधी लागला नाही. यापुढे सार्वत्रिक निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा पवार यांनी केली होती. मात्र यावेळी त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. तेव्हापासून ते कुठून उभे राहणार हे गुलदस्त्यात होते.

यातच माढा मतदारसंघात विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होऊ लागल्याने ही निवडणूक तुम्हीच लढवा, अशी विनंती स्थानिक कार्यकर्त्यांनी पवारांना केली होती. या विनंतीनुसार पवारांनी माढातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. काल टेंभुर्णीला कार्यकर्त्यांचा आग्रहानुसार माढातून निवडणूक लढवत असल्याचे पवार यांनी जाहीर केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here