घरमहाराष्ट्रदिवाळी सणात टँकरच्या पाण्याचा आधार

दिवाळी सणात टँकरच्या पाण्याचा आधार

Subscribe

पुणे शहरातील काही परिसरात अजूनही पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यातच कमी दाबाने अवघे एक ते दोन तास पाणी मिळत आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत नागरिकांना टॅकरचा आधार घ्यावा लागत आहे

पुणे शहरात पाणी कपात सुरु असुन रोज एक वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. पण शहराच्या काही भागात कमी दाबाने अवघे एक ते दोन तास पाणी मिळत आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत नागरिकांना टॅकरचा आधार घ्यावा लागत आहे. टॅकरच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याचे टॅकर दुप्पट दराने विकले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

या परिसरात पाणी टंचाई 

शहरातील पाणी पुरवठया बाबत कालवा फुटी आणि पालिकेचे पंप बंद केल्यानंतर तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याचे संपुर्ण नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शहरात पाणी कपात सुरु असुन रोज एक वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. पण शहराच्या काही भागात कमी दाबाने अवघे एक ते दोन तास पाणी मिळत आहेत. विशेष करुन वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, टिंगरेनगर, धानोरी या भागात पाण्याच्या टॅकरची मागणी वाढली आहे.

- Advertisement -

पालिकेचे टँकर असमर्थ

सध्या शहरात रोज साधारणपणे ४५० टँकरची गरज भासत आहे. पालिकेचे टँकर एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची गरज भागवू शकत नाहीत. नागरिकांना नाईलाजाने खासगी टँकरचालकांकडे जावे लागते. दहा हजार लिटरच्या टॅकरसाठी खाजगी टॅकर चालकाने ४९७ रुपये, पंधरा हजार लिटरच्या टॅकरसाठी ७८३ रुपये, आणि २० हजार लिटरच्या टॅकरसाठी १हजार १०३ रुपये दर पालिकेने निश्चित केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -