घरमहाराष्ट्रमुंबईतील सम-विषम फॉर्म्युला रद्द

मुंबईतील सम-विषम फॉर्म्युला रद्द

Subscribe

५ ऑगस्टपासून सर्व दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत खुली

मुंबईत दुकाने सुरू ठेवण्याचा सम-विषम फॉर्म्युला रद्द करण्यात आला असून मिशन बिगीन अंतर्गत ५ ऑगस्टपासून मुंबईत सरसकट दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मुंबई महापालिकेने दिली आहे. तसेच दारूच्या दुकानातही काऊंटरवर मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आदेशानुसार, मिशन बिगीन अंतर्गत मुंबईतील सर्व दुकाने सकाळी 9 ते 7 पर्यंत सुरू ठेवली जाणार आहे. तसेच दारूची दुकानेही सुरू केली जाणार आहे. त्यानुसार आता काऊंटरवर दारू मिळणार आहे. मात्र, यादरम्यान सर्व गाईडलाईन्सचे पालन करणे गरजेचे असणार आहे. दरम्यान, यापूर्वी एक दिवसाआड दुकाने सुरू करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, यात आता बदल करण्यात आला आहे.

येत्या 5 ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यानुसार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरू करता येणार आहे. मात्र, मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाणार नाही. पण होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंटला किचन सुरू ठेवता येणार आहे.

- Advertisement -

मुंबईत 5 ऑगस्टपासून काय सुरू, काय बंद?

1) सर्व अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार
2) सर्व अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने, मार्केट यांनी सरसकट परवानगी देण्यात आली आहे. सर्व दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू राहतील.
3) काऊंटरवरून दारू विकण्यास परवानगी. याशिवाय दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी. मात्र, यासाठी सरकारने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य. अन्यथा दुकान मालक किंवा संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होईल.
4) 5 ऑगस्टपासून सर्व मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सुरू ठेण्यास परवानगी. पण मॉलमधील थिएटर आणि रेस्टॉरंट यांना यातून वगळण्यात आले आहे. मॉलमधील थिएटर आणि खाद्य पदार्थांच्या स्टॉल किंवा रेस्टॉरंटला अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या किचनसाठी परवानगी देण्यात आली आहे. या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटला होम डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
5) सर्व ई-कॉमर्स कामांना परवानगी
6) सध्या सुरू असलेल्या सर्व कंपन्या सुरूच राहतील
7) सर्व बांधकाम कामांना परवानगी

टॅक्सी, कॅब,चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 3
रिक्षा – चालक + 2
दुचाकी – चालक + 1

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -