घरमहाराष्ट्रअंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार

अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार

Subscribe

आरोपी विकी मात्र फरार असून त्याचा वाकड पोलीस घेत आहेत. जखमी व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने सराईत गुन्हेगाराने कोयत्याने वार केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेत ५८ वर्षीय शिवमूर्ती एकनाथ जाकते हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सराईत गुन्हेगार विकी उर्फ विकास आडागळे याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.

अशी घडली घटना 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शिवमूर्ती एकनाथ जाकते हे घरासमोरील दुकानाशेजारी झोपले होते. तेव्हा, मध्यरात्री अचानक येऊन आरोपी विकी याने त्यांच्या अंगावर लघुशंका केली. त्याचा जाब जखमी शिवमूर्ती यांनी विचारला असता. त्याचा राग मनात धरून आरोपी विकीने तुला तर आता जीवे मारून टाकतो अशी धमकी देऊन सोबत असलेल्या लोखंडी कोयत्याने त्यांच्या डोक्यात, हातावर, वार केले. तसेच त्यांच्या पाठीवर देखील मारहाण करण्यात आली. शिवमूर्ती हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी मात्र फरार असून त्याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. याप्रकरणी जखमी यांचा मुलगा किरण शिवमूर्ती जातके यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

भिवंडीत क्षुल्लक कारणावरुन मित्रावर जीवघेणा हल्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -