‘बहिणाबाई यांच्या काव्यात गीतेचे तत्त्वज्ञान’

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे बहिणाबाईंना अभिवादन करण्यात आले.

Maharashtra
Bahinabai-Chaudhari
बहिणाबाई चौधरी (सौजन्य-गुगल)

बहिणाबाई चौधरी यांचे काव्य वाचता-वाचता आपलंस करणारे असून भाषा, प्रांत या प्रतिकांचा भाग त्यांच्या कवितांच्या आड येत नाही. त्या सर्वांच्या हृदयात भिडतात, भगवत गीतेत सर्वच तत्त्वज्ञान त्यांच्या गावात सामावले आहे, असे प्रतिपादन साहित्यिक चंद्रकांत भंडारी यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यातील बहिणाबाई स्मृती संग्रहालय येथे बहिणाबाईंना अभिवादन करण्यात आले.

दुर्मिळ पत्र-छायाचित्र ट्रस्टला सुपूर्द

कार्यक्रमात भगवान छगन खंबायत यांनी ममन वढाय वढायफ ही कविता म्हटली. अनुभूती इंटरनॅशनल स्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसह मराठी शिक्षक परशुराम माळी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थांपैकी चिन्मय कलंत्री याने मपेरणी पेरणी आले पावसाचे वारेफ ही कविता म्हटली. याप्रसंगी शरद पाटील, पी. के. देवरे, गिरीश पाटील, तुषार वाघुळदे यासह साहित्यिक रसिकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. फैजपूर येथील रामचंद्र नथ्यू जावळे यांनी सोपानदेवांच्या १९८०-८१ मधील हस्ताक्षरांची पत्रे आणि छायाचित्रे ट्रस्टला संग्रहासाठी सुपूर्द केले. या वेळी सोपानदेवांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

बहिणाबाईंची ६८ वी पुण्यतिथी 

बहिणाबाई चौधरी यांचा जन्म ११ ऑगस्ट १८८० साली झाली असून त्यांचा मृत्यू ३ डिसेंबर १९५१ साली झाला. ही त्यांची ६८ वी पुण्यतिथी होती. मराठी साहित्यातील एक महत्त्वाच आणि आदरानं घेतलं जाणार नाव म्हणजे बहिणाबाई चौधरी. बहिणाबाईंच्या कविता खान्देशातील त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग, अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे, काही परिचित व्यक्ती, असे आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here