स्वातंत्र्यदिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारला फुलांचा तिरंगा

दिव्यांग मुलांनी चक्क फुलांच्या सुगंधाद्वारे त्या फुलाचा रंग ओळखून या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तिरंगा तयार केला आहे. या उपक्रमात २५ अंध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

wada
Physical disable students deorated by india flag flowers on the occasion of independence day
स्वातंत्र्यदिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारला फुलांचा तिरंगा

भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या देशाप्रती भावना व्यक्त करता याव्या यासाठी फुलांचा तिरंगा साकारला आहे. ५ ते १४ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी फुलांचा तिरंगा साकारला आहे. फक्त फुलांच्या सुगंधाद्वारे त्या फुलाचा रंग ओळखून या दिव्यांग विद्यार्थ्यांनी झेंडा तयार केला आहे. श्रीरंग संस्थेतर्फे कलादिग्दर्शक सुमीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांनी ही किमया साधत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. मंगळवारी सकाळी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वाडा इथल्या झाडपोळी परिसरातील ओमकार अंध आणि विशेष शाळेत दिव्यांगांनी हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

या उपक्रमात २५ अंध आणि विशेष विद्यार्थी यात सहभागी झाले होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईतील बाजारपेठेत कापडी झेंडे, तिरंग्याच्या रंगातील झिरमिळ्या, सजावटीचे सामान याची रेलचेल सुरू झाली आहे.

प्लास्टिकबंदीमुळे कापडी तिरंग्यांना मागणी वाढल्याचे विक्रेते सांगतात. पण, आपल्या आयुष्यातील अंधार कोणत्या ना कोणत्या कारणावरुन कमी करता यावा यासाठी श्रीरंग संस्थेतर्फे या विशेष मुलांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. ज्यातून या विद्यार्थ्यांना आनंद आणि आयुष्य जगण्यासाठीचा विश्वास देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचं कलादिग्दर्शक सुमीत पाटील यांनी सांगितलं.


हेही वाचा – वाडाच्या दिव्यांग मुलांना बोलीभाषांतील राख्यांचे अप्रूप