धक्कादायक; गतिमंद मुलीवर आत्याच्या नवऱ्याकडूनच बलात्कार

अल्पवयीन गतीमंद मुलीवर तिच्या आत्याच्या नवऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चाकणमध्ये घडली आहे. नराधम आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

Pune
minor-rape
प्रातिनिधिक फोटो

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात गतिमंद अल्पवयीन मुलीवर नातेवाईकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय नातेवाईकाला चाकण पोलिसांनी जेरबंद केलं असून खेड न्यायालयाने सोमवारपर्यंत नराधम आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीचे वडील शेतात कामाला गेले, तेव्हा मुलीवर बलात्कार झाला. प्रकरणाची कोणाकडे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी आरोपी नातेवाईकने मुलीला दिली होती. त्यामुळे हे प्रकरण काही काळ समोर आलं नव्हतं.

कशी घडली घटना?

सविस्तर माहिती अशी की,१४ वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलगी आणि तिचे वडील चाकण परिसरातील ग्रामीण भागात राहतात. त्यांचे शेतात घर असून नातेवाईक गावामध्ये राहतात. काही वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या आईचे आजाराने निधन झाले. गतिमंद मुलीची सर्व जबाबदारी तिच्या वडिलांनी घेतली. त्यांनी दुसरा विवाह केला नाही. मुलीकडे नेहमी गावात राहणारे नातेवाईक येत असत. दोन दिवसांपूर्वी दुपारी वडील शेतात काम करायला गेले तेवढ्यात गावातील आत्याचे पती ४६ वर्षीय नराधम आरोपी घरात आला. दरवाजाची कडी लावत त्याने १४ वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार केला. ‘घडल्या प्रकाराची माहिती कुठे दिल्यास तुला ठार करेल’, अशी धमकी त्याने मुलीला दिली होती.


हेही वाचा – अजमेरमध्ये तरुणीवर बलात्कार; पोलिस म्हणे भूतबाधा झाली!

कसा समोर आला गुन्हा?

परंतु, आत्या शेतात काम करत असताना पीडित मुलीने पोट दुखत असल्याचे सांगितले, तेव्हा हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, या घटनेप्रकरणी आरोपीच्या पत्नीने चाकण पोलिसात फिर्याद दिली असून नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित आरोपीला खेडच्या न्यायालयात हजर केलं असता त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी एम. टी. शिंदे करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here