घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये मंदिरातील दानपेट्या पळवणारे भावंड गडाआड

पिंपरी-चिंचवडमध्ये मंदिरातील दानपेट्या पळवणारे भावंड गडाआड

Subscribe

पिंपरी-चिंचवड परिसरातील मंदिरातील दानपेट्या पळवणाऱ्या दोन सख्या आरोपी भावाना खंडणी दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केलं आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरातील मंदिरातील दानपेट्या पळवणाऱ्या दोन सख्या आरोपी भावाना खंडणी दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केलं आहे. त्यांच्यावर शहरातील चार पोलीस ठाण्यात दानपेटी पळवून त्यातील पैसे लंपास केल्याचा गुन्हा दाखल होता. त्याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत होते. विशाल रमेश भालेराव आणि अजय रमेश भालेराव अस सराईत आरोपी भावाचे नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरिमध्ये मंदिराची दानपेटी आरोपी विशाल आणि अजय यांनी लंपास केली होती. अशाच प्रकारच्या चोऱ्या त्यांनी निगडी, चिखली, पिंपरी येथे देखील केल्या होत्या.त्यामुळे पोलिस त्यांच्या मागावर होते.पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे यांना दोन्ही आरोपी बंधू हे भोसरी येथील गवळी माथा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने कारवाई करत दोघांना अटक केली. आरोपी हे मंदिराची रेकी करून संध्याकाळी चोरी करायचे. त्यांच्यावर मंदिर दानपेटी फोडण्यासह घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई कामगिरी खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -