घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात खंबीर नेतृत्वाची कमतरता; पीयूष गोयल यांनी ठाकरे सरकारवर केला आरोप

महाराष्ट्रात खंबीर नेतृत्वाची कमतरता; पीयूष गोयल यांनी ठाकरे सरकारवर केला आरोप

Subscribe

राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मजुरी नसल्याने अनेक मजूर पायपीट करत आपल्या राज्यात परतत आहे. यासाठी राज्य सरकारने या मजुरांची पायपीट थांबविण्याकरिता रेल्वे आणि बसेसची व्यवस्था केली. पण काही केंद्र सरकार रेल्वेगाड्या हव्या तशा देत नसल्याचा आरोप राज्य सरकार करत आहे. तसेच यादरम्यान राज्य सरकार आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकार कोलमडले आहे आणि राज्यात नेतृत्वाची कमतरता असल्याचा आरोप सोमवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, ‘कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याशी कधीही संपर्क साधला नाही. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्य सचिव आणि नोडल अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते.’

- Advertisement -

२४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करताना केंद्राकडून मजुरांसाठी कोणतीही पावले उचलण्यात आली नसल्याचा दावा केला. तसेच ८० रेल्वेगाड्यांची मागणी केली होती पण फक्त ५० टक्के रेल्वेगाड्यांना परवानगी दिली जात असल्याचा आरोप केला होता. पण या आरोपाचे गोयल यांनी खंडन केले आहे. तसेच हा आरोपी पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, रेल्वेगाड्यांच्या संदर्भात टीका होत असल्याचे मी वाहिन्यावंर पाहिले होते. त्यानंतर महाराष्ट्राला त्वरित १२५ रेल्वेगाड्या पाठवण्याचा निर्णय घेतला. तसेच महाराष्ट्र सरकारने यादी तयार ठेवण्याचीही विनंती केली. आमची महाराष्ट्राला हव्या तेवढ्या रेल्वेगाड्या देण्याची तयारी आहे. परंतु सरकारडे यादी तयार नाही तसेच प्रवासी मजूर कुठे आहेत याबाबत माहिती आहे. ही अत्यंत वाईट बाब आहे. महाराष्ट्र आणि मुंबई शहराचे वास्तव सर्वांसमोर आले. आज ज्या परिस्थितीतून माझे राज्य आणि शहर जात आहे ते पाहून मला खूप वाईट वाटत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रापेक्षा गुजरातला मिळाल्या जास्त श्रमिक ट्रेन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -