घरमहाराष्ट्रभिवंडीत आढळली प्लॅस्टिकची अंडी; अंडी खाणा-यांची उडाली धांदल

भिवंडीत आढळली प्लॅस्टिकची अंडी; अंडी खाणा-यांची उडाली धांदल

Subscribe

नुकताच भिवंडी तालुक्यातील सुरई या गावातील संतोष साळवी यांनी आपल्या घरी खाण्यासाठी ४० अंडी नेली असता त्यामधील काही अंडी ही प्लॅस्टिकची आढळून आल्याने एकच खळबळ

मागील वर्ष भरापासून सर्वत्र चर्चिली गलेली प्लॅस्टिकची अंडी भिवंडी तालुक्यात दाखल झाल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे . नुकताच भिवंडी तालुक्यातील सुरई या गावातील संतोष साळवी यांनी आपल्या घरी खाण्यासाठी ४० अंडी नेली असता त्यामधील काही अंडी ही प्लॅस्टिकची आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.

- Advertisement -

शंका आल्याने अन्न व औषध प्रशासनाकडे संपर्क

तालुक्यातील सुरई येथील संतोष साळवी यांनी गावाजवळील माणकोली येथून आपल्या घरी खाण्यासाठी ४० अंडी खरेदी करून घरी आणले. त्यांची पत्नी मनीषा हिने यापैकी काही अंडी मुलांना खाण्यासाठी उकडली असता त्याच्या कवचाचे तुकडे तुकडे निघत होते. त्यातील बलक खात असताना त्या अंड्यास नेहमीचा ओळखीचा वास येत नसल्याने त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी आपल्या पतीस या अंड्यांबाबत सांगितले असता त्यांनी सुध्दा काही अंडी फोडून पाहिली तर त्यातील पिवळा बलक हा एक वास विरहित आढळला. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे विभागीय कार्यालयात संपर्क साधला .

- Advertisement -

 

अन्न औषध निरीक्षकांकडून अंड्याची तपासणी

ठाणे येथील अन्न औषध निरीक्षक माणिक जाधव यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कडील सहा अंडी परीक्षणासाठी ताब्यात घेतली. त्याची चाचणी झाल्यावरच ही अंडी नक्की कसली आहेत याचा तपास लावणार असल्याचे सांगितले जाणार आहे, अशी माहिती दिली .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -