घरदेश-विदेशखुशखबर! मान्सून आला; अंदमानात दाखल

खुशखबर! मान्सून आला; अंदमानात दाखल

Subscribe

दुष्काळाच्या संंकटाने नभ व्यापून दोन घोट पाण्यासाठी दाही दिशा झाल्या असताना आनंदाची वार्ता घेऊन अखेर मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. १८ ते १९ मे रोजीपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार शनिवारी पावसाने अंदमानात हजेरी लावली आहे.

नैऋत्य मोसमी वार्‍यांनी अंदमान निकोबार बेट, अंदमानातील समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. दुष्काळाची भयानता सर्वत्र व्यापून उरली आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जगायचे कसे असा जीवघेणा प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच यंदाचा मान्सून हा उशिरा दाखल होणार, अशी माहिती स्कायमेटकडून वर्तवण्यात आल्याने या भीतीत आणखी भर पडली होती. केरळमध्ये पावसाचे ६ जून रोजी आगमन होणार असून त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी राज्यात मान्सून सक्रिय होईल असे सांगण्यात आल

- Advertisement -

किमान हवामान खात्याचा अंदाज खरा होवो, अशी बळीराजा मनोमनी प्रार्थना करत असताना शेवटी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. विशेष म्हणजे यंदा सरासरीच्या 95 ते 104 टक्के सामान्यत: मान्सून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे 30 मेपर्यंत मान्सून दाखल होतो; पण यावेळी मान्सून काही दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचे म्हटले आहे. मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असेही सांगण्यात आले होते. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा अल निनो वादळाचा प्रभाव कमी असणार आहे. जर त्याचा प्रभाव असाच कमी राहिला तर शेतकर्‍यांसाठी यंदाचा मान्सून आनंदाचा आहे.

- Advertisement -

काय आहे अल निनो वादळ?
– प्रशांत महासागरात, पेरूच्या जवळील किनारपट्टीवर उष्णता वाढते त्याला अल निनो म्हणतात. गेल्या काही वर्षांपासून      प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान सातत्याने वाढत आहे.
– मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो, असेही सांगण्यात आले होते.
– हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या अंदाजानुसार, ‘अल निनोचा प्रभाव कमी असेल त्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा     जास्त असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना यंदाच्या मौसमात दिलासा मिळू शकतो.’

मान्सून चांगला झाला तर त्याचा परिणाम कोणत्या गोष्टींवर होणार? 

1.आर्थिक विकास चांगला होईल, 2. शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळेल. 3.अनेक ग्रामीण भागांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.4.चांगला पाऊस झाला तर उत्पादन चांगलं येईल आणि शेतकर्‍यांना, छोट्या व्यापार्‍यांना फायदा होईल. 5. महामाई कमी होण्याची शक्यता 6. शेअर बाजारावर होऊ शकतो परिणाम 7. पाऊस चांगला झाला तर त्याचा फायदा बँक आणि फायनान्शियल सेक्टरलाही होणार आहे. 8.शेतकर्‍यांना आवश्यक ती उपकरणे, वस्तू, खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

कुठे पडणार कमी पाऊस

स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, यावर्षी बंगाल, बिहार, झारखंडमध्ये कमी प्रमाणात पाऊस पडणार आहे.
भारतामध्ये पूर्वेला 92 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. मध्य भारतात मान्सून 50 टक्क्यांपेक्षा कमी होऊ शकतो.

अंदमान आणि निकोबार तसेच बंगालचा उपसागर याठिकाणी मान्सून सक्रिय झाला आहे. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये मान्सून आणखी सक्रिय होण्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे.
-कृष्णानंद होसाळीकर, उप महासंचालक,भारतीय हवामानशास्त्र विभाग, मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -