घरमहाराष्ट्रनाशिकमहाजनादेश यात्रा समारोपास पंतप्रधान ३१ ऑगस्टला नाशकात

महाजनादेश यात्रा समारोपास पंतप्रधान ३१ ऑगस्टला नाशकात

Subscribe

पंतप्रधानांच्या उपस्थितीतच विविध विकास कामांच्या प्रकल्पांचेही भूमीपूजन, लोकार्पण करून नाशिककरांची मने जिंकण्याची भाजपची रणनीती

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढण्याचे निश्चित केले आहे. ही यात्रा १ ऑगस्टपासून काढण्यात येणार असून ३१ ऑगस्ट रोजी या यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

भाजपच्या महाजनादेश यात्रेची सुरुवात अमरावती जिल्ह्यातून होणार असून यावेळी पक्षाध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. या यात्रेत मुख्यमंत्री राज्यभरात सरकारने राबवलेल्या योजनांची माहितीही नागरिकांना देणार आहेत. यात्रेदरम्यान विविध ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये ३१ ऑगस्ट रोजी महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असून समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या उपस्थितीतच विविध विकास कामांच्या प्रकल्पांचेही भूमीपूजन, लोकार्पण करून नाशिककरांची मने जिंकण्याची भाजपची रणनीती आहे.

- Advertisement -

यापूर्वी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत तपोवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली होती. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यानंतर नाशिक, दिंडोरी मतदारसंघावर युतीचा झेंडा फडवला. आता पुन्हा एकदा महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी नाशिकला येत असल्याने भाजपेयींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निमित्ताने पंतप्रधानांच्या हस्ते महामेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचेही नियोजन करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -