घरमहाराष्ट्रमोदी म्हणाले, आज मी मिठाई खाऊनच जाणार

मोदी म्हणाले, आज मी मिठाई खाऊनच जाणार

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी नंदूरबार येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौरा केला. नाशिक येथे त्यांची भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. नाशिक दौऱ्यानंतर नंदूरबार येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचारसभेला लोकांची प्रचंड गर्दी दिसली. या सभेतील भाषणाची सुरुवात मोदींनी आदिवासी भाषेत केली. नंदूरबार येथे आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे. त्यामुळे आदिवासी मतदाराला आकर्षित करण्यासाठी त्यांनी आदिवासी भाषेत भाषणाला सुरुवात केली.

आज मी मिठाई खाऊनच जाणार – मोदी

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आवास योजने संदर्भात माहिती दिली. आवास योजनेचा नंदूरबारवासीयांना चांगला फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, ‘व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये नंदूरबारच्या महिलांनी या योजनेवर आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी नंदूरबारच्या महिलांनी मला सांगितलं होतं की, नंदूरबारला आले की तुम्हाला मिठाई खाऊ घालेल. त्यामुळे आज मी मिठाई खाऊनच जाणार.’ यापुढे ते म्हणाले की, ‘मला मिठाई खाऊ घातल्याबद्दल तुम्ही निवडणूक आयोगाला घाबरु नका.’

- Advertisement -

भ्रष्ट सरकार बनले तर सर्वांचेच नुकसान – मोदी

यावेळी मोदी म्हणाले की, ‘२०१४ साली तुम्ही सर्वांनी भरघोस मतदान करुन भाजपला तुम्ही निवडूण दिले. यावेळी देखील असेच भरघोस मतांनी निवडूण द्या. देशाचा चांगला विकास घडवायचा असेल तर भाजपला मतदान करा. मित्रांनो जर भ्रष्ट सरकार बनले तर यामुळे सर्वांचेच नुकसान होईल.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -