घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या निर्णयाच्या तयारीत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या निर्णयाच्या तयारीत?

Subscribe

अनेक प्रमुख नेत्यांशी केली चर्चा

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदी सरकारही सतर्क झाले आहे. करोनाला थोपवण्यासाठी पंतप्रधान शक्य तितकी महत्त्वाची पावले उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. करोनाविरुद्ध लढ्याला आणखी बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी रविवारी फोनवरून चर्चा केली आहे.

त्याशिवाय त्यांनी विरोधी पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही फोन केला असून, त्यात सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांचासुद्धा समावेश आहे. या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच राजकीय पक्ष आणि समाजातील प्रत्येक वर्गाला एकजूट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्यामुळे सर्व राजकीय नेत्यांशी सध्या चर्चा करत असल्याची चर्चा रविवारी देशभर होती.

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी संवाद साधून परिस्थिती सांगितली आहे. त्याशिवाय त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशीसुद्धा चर्चा केली आहे. तसेच शरद पवार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोनवर दिर्घकाळ चर्चा केली. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासोबतही ते बोलले आहेत.

यासंदर्भात पंतप्रधानांनी सोनिया गांधी , समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेस सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिजू जनता दल सुप्रीमो आणि ओडिशाचे सीएम नवीन पटनायक, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन आणि तेलंगणाचे सीएम केसीआर यांच्याबरोबर बातचीत केली आहे. अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांनाही त्यांनी फोन केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -