घरमहाराष्ट्रशिवाजीनगर- हिंजवडी मेट्रो मार्गाचे उद्या मोदींच्या हस्ते भूमिपूजन

शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रो मार्गाचे उद्या मोदींच्या हस्ते भूमिपूजन

Subscribe

संध्याकाळी पावणे पाच वाजता श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे- बालेवाडी येथे हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रासह राज्यातील अनेक नेतेमंडळी उपस्थिती लावणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या महाराष्ट्रातील दोन मेट्रो प्रकल्पांचे भूमीपूजन होणार आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो टप्पा क्रं ५ आणि पुण्यातील शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. मंगळवारी संध्याकाळी पावणे पाच वाजता श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे- बालेवाडी येथे हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रासह राज्यातील अनेक नेतेमंडळी उपस्थिती लावणार आहेत.

पार्किंगची चोख व्यवस्था

या कार्यक्रमाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने पार्किंगची व्यवस्था चोख ठेवली आहे. दुचाकी, कार आणि मोठ्या वाहनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांनी साडे तीनपर्यंत कार्यक्रम स्थळी पोहचण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अति महत्वाच्या आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांसाठी हॉटेल ऑर्चिड पार्किग मेन गेट मधून प्रवेश देण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार वाहने पार्क करुन चालत कार्यक्रम स्थळी येणआर आहेत. नागरिक आणि कार्यकर्त्यांना हॉटेल ऑर्चिडच्या मागच्या बाजूला कार पार्किंगमध्ये वाहने पार्क करण्यासाठी जागा ठेवली आहे.

- Advertisement -

ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो मार्गिचे भूमिपूजन

ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो टप्पा क्र ५ च्या मार्गिकेचे भूमिपूजन मंगळवार १८ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून २००४ साली मुंबई मेट्रो मार्गाच्या आराखड्यास आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या टप्प्यांना मान्यता देण्यात आली होती. ठाणे मेट्रो -४ या ३२ किमी वडाळा ठाणे मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले होते. आता कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचे मंगळवारी भूमिपूजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

कल्याण मेट्रोचे मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -