घरमहाराष्ट्रनिविदा प्रक्रियेच्या गोंधळाची चौकशी करणार - चंद्रकांत पाटील

निविदा प्रक्रियेच्या गोंधळाची चौकशी करणार – चंद्रकांत पाटील

Subscribe

पुणे शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पाच्या निविदामध्ये वाढीव दर येत असतील तर त्याची चौकशी होणार असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

शहरातील महत्वाच्या प्रकल्पाच्या निविदा सतत वाढीव दराने येत असल्यामुळे याची सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पुणे महापालिकेला शुक्रवारी त्यांनी भेट दिली. यावेळी चोवीस तास पाणी पुरवठा, नदी सुधार प्रकल्प आणि एचसीएमटीआर महापालिका प्रशासनाने त्यांच्यासमोर सादरीकरण केले. या प्रकल्पाची माहिती घेतल्यानंतर यामध्ये येणार्‍या अडचणी राज्य आणि केंद्र स्थरावर कशा सोडवता येतील. याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

या बैठकीला खासदार गिरीष बापट, महापौर सौ.मुक्ता टिळक, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, जिल्हाधिकारी निवलकिशोर राम, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, महापालिका प्रशासनाचे अधिकारी त्याचबरोबर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

तब्बल ३०० कोटी रुपयांनी वाढीव निविदा

चोवीस तास पाणीपुरवठा योजना आणि नदी सुधार प्रकल्पांच्या निविदा मोठ्याप्रमाणात वाढवून आल्या आहेत. तसेच मोठ्या प्रकल्पांच्या निविदा वाढण्याच्या ट्रेंड महापालिकेत आहे. याबाबत त्यांना विचारले असता प्रकल्पाच्या मोठ्या प्रमाणात निविदा वाढवून येत असतील तर त्याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले. नुकत्याच नदी सुधार प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या निविदेमध्ये तब्बल ३०० कोटी रुपयांनी वाढीव निविदा आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत मोठ्याप्रमाणात वाढली आहे. म्हणून याची चौकशी करु, असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.

नदी सुधार प्रकल्पाची निविदा मोठ्याप्रमाणात वाढलेली आहे

पाटील म्हणाले, कोणत्याही कामाची निविदा १० टक्के अथवा त्याच्या जवळ वाढली तर समजू शकतो. मात्र त्यापेक्षा अधिक वाढत असतील तर तपासावे लागेल, असे पाटील म्हणाले. याविषयी महापालिका आयुक्त सौरभ राव म्हणाले, नदी सुधार प्रकल्पाची निविदा मोठ्याप्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे केंद्रशासन आणि जायका कंपनीला याबाबत कळवण्यात आले आहे. महापालिकेच्या दृष्टीने ही निविदा मान्य करणे योग्य होणार नसल्यामुळे पुन्हा निविदा काढण्यात यावी असे कळवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -