पुण्यात पोषण आहारातून २३ विद्यार्थ्यांना विषबाधा

पुण्यातील कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेमधील एकूण २३ विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या भातातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune
pune
पुण्यात विद्यार्थ्यांना विषबाधा

पुण्यातील कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेमधील एकूण २३ विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या भातातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी ४ मुले अत्यवस्थ असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सविस्तार माहिती अशी की,

विषबाधा झालेली ही सर्व मुळे इयत्ता आठवी इयत्तेत शिकत होती. या मुलांना नेहमीप्रमाणे पोषण आहाराचा भात देण्यात आला. त्यानंतर या मुलांना उलट्या सुरू झाल्या. तसेच त्यांना चक्करही येऊ लागली. त्यानंतर त्यांना तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका संपदा किरकोले यांनी दिली. किरकोले यांनीही हा भात खाल्ला. त्यानंतर त्यांचीही प्रकृती बिघडली. त्यांनाही भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, १९ मुलांची प्रकृती चांगली असून ४ मुलं अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

हेही वाचा – ‘पारले’मधील हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here