मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदाराला अटक

पिंपळे गुरव येथे नदी काठेवर महादेव मंदिराच्या बांधकाम जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना मजुरांच्या अंगावर सभामंडप पडून तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ठेकेदार राहुल जगताप याला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Pune
representative photo
प्रातिनिधीक फोटो

मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदाराला सांगवी पोलिसांनी अटक केवली आहे. मंदिर दुर्घटने प्रकरणी ठेकेदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. राहुल जयप्रकाश जगताप असं ठेकेदाराचे नाव आहे. या ठेकेदारास पिंपरी-चिंचवड महानगर पालिका बांधकाम परवाना विभाग यांनी सदरचे मंदिर हे अनधिकृत असल्याने नोटीस बजावली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराने मंदिराचे बांधकाम सुरू ठेवले होते. तेव्हा सभामंडप कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत.

नेमके काय घडले?

बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथे नदी काठेवर महादेव मंदिराच्या बांधकाम जीर्णोद्धाराचे काम सुरू होते. काही मजूर हे मंदिरात दगड आणून टाकत होते, तर काही जण सभामंडपाला आधार दिलेले लोखंडी रॉड आणि लाकडी बांबू काढून घेण्याच काम करत होते. त्याचवेळी अचानक सभामंडप मजुरांच्या अंगावर कोसळला यात १२ कामगार अडकले होते. त्यातील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये एका महिलेचा देखील समावेश होता. तर घटनेमध्ये नऊ मजूर जखमी झाले होते. याप्रकरणी ठेकेदार राहुल जगताप याच्यावर मृत्यूस जबाबदार ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कामगारांना हेल्मेट, सेफ्टी शूज, सेफ्टी जाळी दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. त्यामुळे जगताप याला सांगवी पोलिसांनी जेरबंद केलं आहे. अधिक तपास सांगवीचे पोलीस उपनिरीक्षक निकुंभ हे करत आहेत.


हेही वाचा – ग्राहकाचे १७ लाख घेऊन ठेकेदार फरार

हेही वाचा – ठेकेदार वसुल करतो कचरा उचलण्याचे पैसे


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here