घरमहाराष्ट्रगोंदियातील मोदींच्या सभेनंतर पोलिसांच्या बसला अपघात; ११ जखमी

गोंदियातील मोदींच्या सभेनंतर पोलिसांच्या बसला अपघात; ११ जखमी

Subscribe

गोंदिया येथील नवीन बायपास मार्गावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेवरून परतणाऱ्या पोलिसांच्या बसला अपघात झाला. गोंदिया-आमगाव मार्गावर हा अपघात झाला असून हा अपघात बुधवारी रात्री १० च्या सुमारास झाला. या अपघातात ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात दुसरी सभा बुधवारी गोंदियामध्ये पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेच्या भाषणा दरम्यान सर्वांचे आभार मानले. निवडणुकीचा प्रचार मी अनेकदा केला पण अशी गर्दी कधी पाहिली नसल्याचे मोदींनी म्हटले. यावेळी, त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. घराणेशाहीला संपुष्टात आणण्याचा विडा उचलला असल्याचे मोदींनी सभेत सांगितले.

गोंदिया-आमगाव मार्गावरअपघात

गोंदिया येथील नवीन बायपास मार्गावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेवरून परतणाऱ्या पोलिसांच्या बसला अपघात झाला. गोंदिया-आमगाव मार्गावर हा अपघात झाला असून हा अपघात बुधवारी रात्री १० च्या सुमारास झाला. या अपघातात ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. गोंदिया-आमगाव मार्गावर ठाणा गावाजवळील गोरेगाव मार्ग वळणाच्या रस्त्यावर हा अपघात झाला.

- Advertisement -

११ जखमीपैकी ४ ते ५ पोलीस गंभीर

अपघात झालेल्या या बसमध्ये पुणे येथील ग्रुप-डीचे जवळपास २६ ते २७ पोलीस कर्मचारी होते. या ११ जखमींमध्ये पोलीस शिपाई भरत धोंडीराम मालवदे, एएसआय चुन्नीलाल राठोड, अमित जगताप, डी. डी. डांगे, राहुल लोंढे, विशाल कांबळे, समर बनसोडे, एम.जे.कोळी, सत्यवान कांबळे, रवि नेवाले व विशाल कांबळे यांचा समावेश आहे. जखमीपैकी ४ ते ५ पोलीस गंभीर असल्याने त्यांना डॉ. बजाज यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -