घरठाणेकोरोनावर मात करून परतलेल्या कोरोना योद्ध्याच्या भेटीला पोलीस आयुक्त फणसाळकर

कोरोनावर मात करून परतलेल्या कोरोना योद्ध्याच्या भेटीला पोलीस आयुक्त फणसाळकर

Subscribe

कोरोनाशी लढा देऊन तब्बल ७० दिवसांनी रुग्णलयातून घरी परतलेले राबोडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगतराव साळुंखे यांची सोमवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान पोलीस आयुक्त यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ठाणे शहरातील राबोडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर असणारे ५५ वर्षाचे भगतराव साळुंखे हे ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका चाळीत पत्नी आणि दोन मुलासह राहण्यास आहेत. दोन महिन्यापूर्वी साळूंखे यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान त्यांना ठाण्यातील वेदांत रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, उपचाराच्या काळात त्यांची प्रकृती खालावली होती. वेदांत रुग्णालयात दीड महिने उपचार घेतल्यानंतर त्यांना वर्तक नगर येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. १३ दिवसांनी त्यांना पुढील उपचाराठी मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी दहा दिवसांच्या उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेले साळुंखे यांना आठवड्यापूर्वी बॉम्बे रुग्णालयाने घरी सोडले. तब्बल ७० दिवस कोरोनाशी झुंज देऊन पूर्णपणे बरे होऊन घरी परतलेले कोरोना योद्धा सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भगतराव साळुंखे यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांच्या राहत्या परिसरातील नागरिकांनी स्वागत केले.

- Advertisement -

दरम्यान कोरोनाशी झुंज देऊन तब्बल ७० दिवसांनी घरी परतलेले साळुंखे यांची दोन दिवसापूर्वी राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. व्ही. सिरतोडे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सोमवारी ठाणे पोलीस दलाचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भगतराव साळुंखे यांच्या चाळीतील घरी जाऊन भेट घेतली, व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

“कोरोनाच्या काळात काम करीत असताना पावसात भिजल्यामुळे थोडा त्रास जाणवू लागला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आपले कर्तव्य पार पाडत होतो. मात्र त्रास जास्त सुरु झाल्यानंतर मला रुग्णलायत दाखल करण्यात आले होते. मला कोरोनाची लागण झाली आणि माझे फुफ्फुसांनी जवळपास काम करणे बंद केल्यामुळे माझी प्रकृती अधिकच खालावली होती. परंतु या आजारावर मात करण्याची जिद्द मनात ठेवून कोरोनासोबतचे युद्ध जिंकू शकलो,” असे मत कोरोना योद्धा भगतराव साळुंखे यांनी आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -